वन्यजीवाबाबत जिव्हाळा निर्माण व्हावा व मानवाकडुन त्यांना सुरक्षा कवच तयार व्हावे यासाठी वनविभाग कार्यरत- खा. रामदास तडस

वर्धा/प्रतिनिधी मानव वन्यजिव संघर्ष यामुळे मानव व वन्यजिव यामधिल दुरावा कायम स्वरुपी वाढत असुन मानवाच्या मनात वन्यजिवाचे विषयी तिरस्कार निर्माण होतांना दिसतो. हा दुरावा दुर होवून मुक्या वन्यजिवाबाबत जिव्हाळा निर्माण व्हावा व मानवाकडुन त्यांना सुरक्षा कवच तयार व्हावे यासाठी वनामध्ये कार्य करणारे कर्मचारी व अधिकारी कार्य करीत असते, त्यांच्या या कार्याचा गौरव वन्य प्राण्यासाठी कार्य करणारी संस्था पिपल्स फॉर ॲनिमल वर्धा व्दारे होत आहे, ही अभिमानाची बाब आहे, पिपल्स फॉर ॲनिमल ही संस्था वन्यप्राण्याच्या सेवेसाठी नियमीत कार्यरत असते, त्यांच्या कार्य वन्यप्राण्यासाठी वरदान ठरत असल्याचे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पीपल फॉर एनिमल्स, वर्धा करुणाश्रम द्वारा वर्धा वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल व वनरक्षकांचा सत्कार कार्यक्रम वर्धा लोकसभा मतदार क्षेत्राचे खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपवनसंरक्षक वर्धा श्री राकेश सेपट, प्रमुख उपस्थिती म्हणून सहायक उपवनसंरक्षक श्री अमर्जीत पवार, श्री गजानन बोबडे, जैन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अभिषेक बेद, करुणाश्रम चे सचिव आशिष गोस्वामी यांची उपस्थिती होती. यामध्ये प्रामुख्याने कारंजा वनपरिक्षेत्रात नरभक्षक ठरत असलेल्या टी ७ वाघिणीच्या व्यस्थापन सांभाळणा-या चमू चा तसेच मानव व वन्यजीव संघर्ष कमी करण्याकरिता प्रयत्नरत असणा-या वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल व वनरक्षकांचा समावेश आहे. यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी कारंजा श्री अभय ताल्हण, वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी श्री रुपेश खेडकर, खरांगणा वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. गजभे, वनपाल श्री प्रवीण डेहनकर, एन. एस राऊत, एल एन चौखे, एन एन हुकरे व वनरक्षक श्री सी एस उईके, एस एस सिद्दीकी, के बी दहातोंडे, पी डी बेले, ए बी कोरडे, कु. एस एम काझी, पी डी कानेरी, ववाहनचालक श्री ए आर पठाण यांना केलेल्या उत्कृष्ठ कार्याबद्दल वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री रामदास तडस व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन ऋतुजा मोरणकर यांनी केले तसेचप्रास्ताविक संस्थेचे सचिव आशिषगोस्वामी यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी करण्याकरिता ऋषिकेशगोडसे, शुभम बोबडे, अनुष्कपंचभाई, महेश गिरपुंजे, रोहितकंगाले, सुमित जैन, कौस्तुभ गावंडेयांनी परिश्रम घेतले. करुणाश्रम, वर्धा येथेजवळजवळ दीड वर्षांपासूनदाखल झालेला जग्गू आता १७ महिन्यांचा झालाय, त्याची खासदाररामदास तडस यांनी पाहणी केली वआईपासून दुरावलेल्या बिबट्याच्याबछड्याची लहानपणापासूनवर्ध्याच्या करुणाश्रमात विशेषकाळजी घेतली जात असल्यानेखासदार रामदास तडस यांनी समाधान व्यक्त केले.