वर्धेत भंगार गोदामाला आग; लाखोंचे नुकसान

वर्धा/प्रतिनिधी येथील एमआयडीसी परिसरातील भंगाराच्या गोदामाला सकाळी ८ वाजताच्या सुमारास आग लागली असून नियंत्रणासाठी अग्नीशमन दलाल पाचारण करण्यात आले आहे. आगीची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घटनास्थळाची पाहणी केली. एमआयडीसी परिसरातील भंगाराच्या गोदामाला आग लागली असून त्यावर नियंत्रणासाठी पुलगाव येथील अडर्सन, उत्तम गलवा, बुटीबोरी औद्योगिक वसाहत येथूनअग्निशमन गाड्या ६ आगनियंत्रणात आणण्याचा प्रयत्नकरीत आहे. जुने प्लास्टिक,बॉटल, लाकूड फाटा असल्याने आग चांगलीच भडकत आहे.

या आगीने लगतच्या गोदामातशिरकाव सुर केल्याची माहिती उद्योजक प्रवीण हिवरे यांनी दिली.आगीत लाखो रुपये किमतीची हानी होण्याची शक्यता वतरवण्यातयेत आहे. आगीवर नियंत्रणलगेच नियंत्रण मिळाले नसते तर परिसरातील ५-६ कारखान्याना त्याची झळ पोहोचून करोडोरुपयांचे नुकसान झाले असते.आगीची माहिती मिळाल्यानंतर खा. तडस यांनीही घटनास्थळी भेट दिली.