भारताच्या संरक्षण कॉरिडॉरमध्ये गुंतवणूकीसाठी जर्मनीला आमंत्रण

नवी दिल्ली/प्रतिनिधी द्विपक्षीय चर्चेसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या जर्मन समकक्षांचे दिल्ली कँटमधील माणेकशॉ सेंटरमध्ये स्वागत केले. येथे त्यांनी तिन्ही लष्कराच्या गार्ड ऑफ ऑनरची पाहणी केली. यानंतर उपस्थित असलेले शिष्टमंडळस्तरीय बैठक झाली. जर्मनीचे प्रतिनिधित्व संरक्षण मंत्रालयाचे राज्य सचिव बेनेडिक्ट झिमर यांनी केले तसेच वरिष्ठ अधिकारी आणि भारतातील जर्मनीचे राजदूत उपस्थित होते. २०१५ नंतर जर्मनीच्या सहकार्य, विशेषतः औद्योगिक भागीदारी वाढवण्यासाठी चर्चा केली. राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू संरक्षण कॉरिडॉरमध्ये जर्मन गुंतवणुकीचे निमंत्रण दिले.

रक्षा मंत्री यांनी उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमधील दोन संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरमध्ये जर्मन गुंतवणुकीच्या संभाव्यतेसह संरक्षण उत्पादन क्षेत्रात उघडलेल्या संधींवर प्रकाश टाकला. भारताचे कुशल कामगार आणि स्पर्धात्मक खर्च आणि जर्मनीचे उच्च तंत्रज्ञान आणि गुंतवणूक यामुळे संबंध आणखी मजबूत होऊ शकतात, असे प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केले. दोन्ही मंत्र्यांनी सध्या सुरू असलेल्या द्विपक्षीय संरक्षण संरक्षण सचिव गिरीधर अरमाने संरक्षणमंत्र्यांचा हा पहिलाच भारत सहकार्य क्रियाकलापांचा आढावा आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्यासह संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी दौरा आहे. राजनाथ सिंह आणि जर्मनीचे संरक्षण मंत्री यांनी द्विपक्षीय संरक्षण घेतला आणि विशेषतः संरक्षण औद्योगिक भागीदारी वाढवण्याचे मार्ग शोधले.