राजस्थानमध्ये वादंग…पायलट नवीन पक्ष काढणार?

जयपूर/प्रतिनिधी राजस्थान काँग्रेसमधील गोंधळ आणखीनच वाढू शकतो. एका वृतानुसार, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी संघर्षाचे मुद्दे सोडवण्यात काँग्रेस हायकमांड अपयशी ठरल्यानंतर यांनी वेगळा पक्ष काढल्यास काँग्रेससमोर मोठे संकट उभे राहू शकते. राजस्थानमधील ४८ विधानसभा जागांवर सचिनपायलटचे वर्चस्व असल्याचे मानले जात आहे. राजस्थानमध्ये यावर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार सचिन पायलट आता नवीन मार्ग शोधत आहेत. वृत्तपत्रातील आहेत. सचिन पायलट २०२० पासून अशोक गेहलोत बातमीनुसार, सचिन पायलट आता नवीन पक्ष काढू शकतात. सूत्रांच्या हवाल्याने वृत्तपत्राने सांगितले आहे की, सचिन पायलट या पक्षाचे नाव ‘प्रोग्रेसिव्ह काँग्रेस’ ठेवणार आहेत.

११ जून रोजी जयपूरमध्ये सचिन पायलट यांच्या हस्ते पार्टीची सुरुवात होणार आहे. आज त्यांचे वडील आणि काँग्रेस नेते राजेश पायलट यांची पुण्यतिथी आहे. सचिन पायलट विरुद्ध लढत आहेत. त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण काँग्रेस हायकमांडने गेहलोत यांना हटवण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. २५ सप्टेंबर २०२२ रोजी काँग्रेस हायकमांडने मल्लिकाजर्ुन खर्गे आणि अजय माकन यांना जयपूरला पाठवले होते, परंतु गेहलोत छावणीच्या आमदारांनीइतकी बंडखोर वृत्ती दाखवली की दोघेही दिल्लीला परतले.