जिल्ह्यात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण अभियान राबविणार

वर्धा/प्रतिनिधी केंद्र सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सर्वांगीण विकासाची माहिती पोहोचवण्याचे महाजनसंपर्क अभियान ३० जून राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात महिनाभर सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण अभियान राबविणार असल्याची माहिती खा. रामदास तडस आणि भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी सोमवार ५ रोजी स्थानिक हॉटेल तंदूर येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली. लोकसभा स्तरावर या मोहिमेचे १४ टप्पे निश्चित करण्यात आले आहे. वर्धा लोकसभा क्षेत्रात झालेला विकास जनतेपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न, वर्धा येथे समाज माध्यमांसोबत जुळून असलेल्यांचे एकत्रिकरण, डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे आर्वी येथे स्नेहमिलन, १० रोजी हिंगणघाट येथे व्यापारी संमेलन घेण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे संमेलन, भाजपाच्या सात आघाड्या आणि कार्यकर्त्यांचे संमेलन, २१ रोजी तालुकास्तरावर योगदिनाचे आयोजन करून योग प्राणायामचे महत्त्व विषद करण्यात येईल. २० ते ३० जून दरम्यान घरोघरी संपर्क साधण्यात येईल. विधानसभास्तरीय ज्येष्ठ कार्यकर्त्यांसोबत संवाद व स्नेहभोजन, संयुक्त मोर्चा संमेलन, लाभार्थी संमेलनही घेण्यात येणार आहे. २३ रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुण्यतिथी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांशी बुथस्तरीय संवाद साधतील. २५ रोजी आणिबाणीतील कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याचदिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

याच अभियानांतर्गत प्रत्येक विधानसभमतदारसंघातील ५० प्रभावशाली व्यक्तींर्च्याभेटी घेतल्या जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या जनसंपर्क अभियानात खा. रामदास तडस, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, जनसंपर्कप्रमुख जिल्हा महामंत्री अविनाश देवआ. डॉ. रामदास आंबटकर, आ. समीर कुणावार, आ. दादाराव केचे, आ. पंकज भोयर, आ. प्रताप अडसड, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचीमाहितीही खा. तडस आणि जिल्हाध्यक्ष गफाट यांनी दिली. दरम्यान, खा. रामदास तडस यांनी केंद्र सरकारने केलेल्या तसेच वर्धा जिल्ह्यात झालेल्या विकासकामांचीमाहिती दिली. पत्रपरिषदेला जिल्हा महामंत्रीअविनाश देव, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे,राजेश बकाणे, धर्मपाल मेश्राम आदींचीउपस्थिती होती.