ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई/प्रतिनिधी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनानं मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. मुंबईतील दादरमधील एका रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराच्यावेळी मराठी, हिंदी मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज सेलिब्रेटी उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यावेळी सुलोचना लाटकर यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. चाहते, नेटकरी आणि काही कलाकारांनी सोशल मीडियावरुन दीदींना आदरांजली वाहिली आहे. काल मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी होते.

यापूर्वी दीदींच्या निधनाचे वृत्तकळताच बॉलीवूडमधील प्रसिद्धअभिनेते धर्मेंद्र आणि महानायक अमिताभ बच्चन यांनी खास पोस्ट शेयर करत दीदींविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. केवळमराठीच नाहीतर हिंदी चित्रपटांमध्येदेखील सुलोचना लाटकर यांनीआपल्या अभिनयाचा वेगळा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला हाज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी,प्रिया बेर्डे, आशा काळे याअभिनेत्रींनी देखील सुलोचनादीदींसोबतच्या आठवणींना उजाळादिला आहे. तब्बल चारशेहूनअधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्यासुलोचना दीदींचा प्रवास अनेककलाकारांसाठी प्रेरणादायी ठरला. त्यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माणझाली आहे. जी कधीही न भरुन येणारी आहे. सुलोचना दीदींना श्रद्धांजली वाहिली होती. अशी आई होणे नाही असे म्हणत त्यांनी दीदींप्रती भावना व्यक्त केल्या होत्या. दीदींच्या अंत्यसंस्काराच्यावेळी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवर हजर