रेल्वे विभागाचा मोठा निर्णय; तिकीट नसलेल्या प्रवाशांनाही १० लाख रुपये मिळणार…

नवी दिल्ली/प्रतिनिधी ओडिशातील बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनची मालगाडीला धडक लागून २८५+ प्रवाशांचा मृत्यू झाला तर १००० हून अधिक लोक खमी झाले. या अपघातानंतर भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्व प्रवाशांना १० लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही रेल्वेकडून १० लाख रुपये देण्यात येणार असल्याचे रेल्वेने सांगितले आहे. तिकीट न पाहता नुकसान भरपाई दिली जाईल याबाबत अधिक माहिती देताना रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने सरसकट सर्व मृत प्रवाशांच्या वारसांना १० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही भरपाई मिळणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रेल्वेकडून १० लाखांची मदत

अपघातातील मृतांच्यावारसांना रेल्वे मंत्रालयाकडून१० लाखांची, गंभीर जखमींना२ लाख तर किरकोळ जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदतजाहीर झाली. त्याशिवायपंतप्रधान साहाय्यता निधीतूनमृतांच्या वारसांना दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. याशिवायतामिळनाडूचे मुख्यमंत्री एमकेस्टॅलिन आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीहीआपापल्या राज्यातील पीडितांच्याकुटुंबीयांना भरपाई देण्याची घोषणाकेली आहे.