वेणेच्या तीरावर विणले समृद्धीचे धागे

नंदोरी/प्रतिनिधी वेणा नदीच्या तीरावर वसलेल्या हिंगणघाट शहरातील सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक, धार्मिक, औद्योगिक विकास म्हणजे वेणा नदीने विणलेले विकासाचे जणू धागेच आहे, असे म्हणावे लागेल. वेध प्रतिष्ठान नागपूरद्वारा २८ मे पासून सुरू असणार्या वेणा नदी शोध यात्रा प्रवासात वेध चमूने हिंगणघाट शहराला भेट दिली. हिंगणघाट शहरातील विविध स्थळांना भेट देऊन तेथील वैशिष्ट्ये जाणून घेतली. विदर्भातील कापूस पिकास उपयुक्त असलेली काळी कसदार जमीन तसेच वेणा नदीचे उपलब्ध पाणी ही अनुकुलता लक्षात घेऊन ब्रिटीश काळात वेणा नदीच्या तिरावर हिंगणघाट येथे सूतगिरणी नर्माण करण्यात आली.

यामुळे हिंगणघाट परिसरातील लोकांना रोजगारासोबतच कापसाच्या पिकाला भाव सुद्धा मिळाला. या सूतगिरणीची स्थापना १८८१ मध्ये झाली. परंतु, ही सूतगिरणी अलीकडे २००४ साली बंद पडली. वेणा नदी शोध यात्रेत वेध परिवारच्या चमूने या सूतगिरणीला भेट दिली व या बंद गिरणीच्या भूतकाळात दडलेला जीवन इतिहास जाणून घेतला. ब्रिटीश काळातील आणखी एक महत्त्वपूर्ण आठवण म्हणजे कर्नल विल्यम लॅम्बटन यांची हिंगणघाट येथे असलेली समाधी. ब्रिटीश काळातच १८०२ च्या सुमारास कर्नल विल्यम लॅम्बटन यांनी भारताचा त्रिकोणमिती नकाशा तयार करायला सुरुवात केली होती. त्यांचा मृत्यू २० जानेवारी १८२३ ला हिंगणघाट शहरात झाला होता.

भारताचा नकाशा तयार करणार्या या महान व्यक्तीची समाधी तत्कालीन ब्रिटीश सरकारने हिंगणघाट येथे स्थापन केली होती. ती हिंगणघाट शहरात आज काळा गोटा म्हणून ओळखली जाते. शहरातील चित्रकार, शिल्पकार व हरहुन्नरी कलावंत हरीहर पेंदे यांच्या द्वारकामाई या निवासस्थानी जाऊन त्यांचा चित्र संग्रह न्याहाळला व हिंगणघाट शहराविषयी व त्यांचा कलाविषयक जीवन प्रवास जाणून घेतला. वेणा तिरी निर्माण केलेल्या त्यांचास्मशानेश्वर शिव व श्री विठोबा माऊली या विशाल शिल्पकृती सुध्दा न्याहाळल्या.त्याच प्रमाणे नागपूरकर भोसल्यांचे तत्कालीसरदार बिडकर यांनी १८०५ साली बांधून पूर्ण केले.

मल्हारी मार्तंड मंदिराला भेट दिली.  मध्ययुगीन स्थापत्याचा विशेषनमूना असलेल्या या मंदिरातील लघु शिल्पेकलात्मक दृष्ट्या महत्व पूर्ण आहे. हिंगणघाटवेणा शोध यात्रेमध्ये निवृत्त शिक्षक तथा पत्रकार प्रभाकर कोळसे, ज्ञानेश्वर चौधरी, सर्प मित्र प्रवीण कडू, प्रशांत भोयर, लक्ष्मणतेजने, नियाजुद्दीन सिद्धिकी, मिलिंद शिंदे इत्यादी मान्यवरांनी वेणा नदी शोध यात्रेत सहकार्य केले. या शोधयात्रेचा समारोप सावंगी संगम येथे वेणा नदी आणि वर्धा नदी यांच्या संगमावर होणार आहे.