वर्धेत पहाटेच निघाले सायकलवीर

वर्धा/प्रतिनिधी जागतिक सायकलदिनानिमित्त स्थानिक यंग सायकल रायडर्स संघटनेच्या वतीने सायक्लोथॉन ०२३ या सायकल रॅलीच े पहाटे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली डॉ. बाबासाहेब ांबेडकर चौक ते विठ्ठल रुख्मीणी सभागृहापर्यंत ११ किमी काढण्यात आली. रॅलीमध्ये शहरातील ३०० हून अधिक सायकल प्रेमींनी सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे सर्वात लहान ४ वर्षांचा रेयांश अग्रवाल हा तर सर्वात वृद्ध ७८ वर्षांचे मोरेश्वर गोमासे हे सायकलवीर आकर्षण होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृतीला माल्यार्पण सतीश चव्हाण, डॉ. सचिन पावडे, सुधीर गांधी यांनी केले. सायकल रॅलीला उपस्थित मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. या रॅली दरम्यान विविध ठिकाणी समाज जागृतीच्या दृष्टीने भारुड व पथनाट्य सुद्धा सादर करण्यात आले.

रॅलीचा शेवट विठ्ठल रुख्मिणी मंदिर येथे करण्यात आला. सायकलवीरांना यंग सायकल रायडर्सतर्फे मोफत टी-शर्टचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी सतीश चव्हाण, डॉ. सचिन पावडे, न्यायाधीश विवेक देशमुख, मनोज राठी, अजय तिगावकर, पंकज सराफ, निलेश गावंडे, पद्माकर भांदककर, मोरेश्वर गोमासे व इतर मान्यवारांची उपस्थिती होती. प्रास्ताविक सचिनगरपाल यांनी केले. वैभव बोरकुटे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठीसचिन मेघे, प्रसाद पोटदुखे, भूषणतिमांडे, मंगेश दिवटे, पियुषगडकरी, प्रसन्न चौधरी, राहुल ढोक,उमेश टावरी, विजू मोहोड, मयुरेशगुळतकर आदींनी सहकार्य केले. सायकल रॅलीला डॉ. विपीन राऊत,अश्विन साहू, चेतन घंगारे, वैशालीमुत्तलवार, अजय तिगावकर, गुप्तायांचे विशेष सहकार्य लाभले.