पळसगाव (बाई) येथे वादळी वाऱ्याचे तांडव

 सिंदी (रेल्वे)/प्रतिनिधी श्री क्षेत्र पळसगाव (बाई) येथे शनिवार ३ रोजी वादळीवार्यासह आलेल्या पावसामुळे अनेक घरांची छप्पर लांब जाऊन पडली. डझनभर कुटुंबीयांचे संसार उघड्यावर आले आहेत. शनिवारी दुपारच्या सुमारास वजेच्या कडकडासह वादळ आले. त्यात बशीर शेख व दामू कुडे यांच्या घरावरील संपूर्ण छप्पर उडून गेले. बशीर शेख वयोवृद्ध असून निराधार आहेत. त्यांच्या कुटुंबात ते व त्यांच्या वृद्ध पत्नी राहतात. गजानन महाजन यांच्या नवनिर्मित घराची छतावरील भिंत पडली. सुदैवाने कोणीच जखमी झाले नाही.

प्रशांत मडावी यांच्या घरावरील काही टिनपत्रे, तसेच कोठ्यावरील टिना उडत शंभर फुटावर पडल्याचे जाणवले. शेतातील वीज खांब उन्मळून पडलेत, विद्युत पुरवठा खंडित झाला. या नैसर्गिक आपत्तीची दखल प्रशासनाने घेत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच धीरज लेंडे यांनी सेलूचे तहसीलदार व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना निवेदनाद्वारे केली आहे. सरपंच धीरज लेंडे यांनी कोतवाल सतीश कुडुमती सोबत पडझडीची पाहणी केली. महसूल विभागाला सूचना दिली. बशीर शेख, दामू कुडे,