शिवसेनेचा ज्या ठिकाणी खासदार, त्या ठिकाणी शिवसेनाच निवडणूक लढविणार- श्रीकांत शिंदे

कल्याण/प्रतिनिधी ज्या ठिकाणी शिवसेनेचा खासदार आहे, त्याठिकाणी शिवसेनेचा खासदार निवडणूक लढविणार, असे स्पष्ट शब्दांत कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भरसभेत सांगितले. भाजपने मिशन ४५ हा आकडा लोकसभा निवडणुकीसाठी लक्ष्य ठेवला आहे. या ४५ खासदारांच्या मतदार संघात कल्याण लोकसभा आणि पालघर लोकसभेचा समावेश आहे. त्याची जबाबदारी केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर यांना देण्यात आली आहे. त्यानुसार गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून कल्याण लोकसभा मतदार संघात ठाकूर यांचे दोन दौरे पार पडले आहे. कल्याण लोकसभ ेवर भाजपचा डोळा आहे. भाजपकडून दावा केला जात आहे, अशी राजकीय वतर्ुळात चर्चा आहे. या विषयी खासदार शिंदे यांना विचारणा केली असता त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.

कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार उभा करणार असे कोण म्हणाले त्याचे नाव घ्या. भाजप नेत्यांचे जे लोकसभा निहाय दौरे होत आहेत. ते केंद्राकडून देण्यात आले आहेत, त्यापासून आम्हाला काही त्रास नाही. प्रत्येक पक्षाला आपली पक्ष संघटना बांधण्याचा अधिकार आहे. भाजप त्यांची पक्ष संघटना बांधत आहे. जिथे जिथे शिवसेनेचे खासदार आहेत त्या ठिकाणी शिवसेनेचेच खासदार निवडणूक लढणार. हे केंद्राच्या आणि राज्याच्या नेतृत्वाकडून स्पष्ट करण्यात आले. कल्याण लोकसभा मतदारसंघात दौरा करणारे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे माझे मित्र आहेत ते जेव्हा जेव्हा दौऱ्यावर आले तेव्हा मी त्यांचे स्वागत केले. त्यामुळे कोणीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. डोंबिवलीतील पाटीदार भवन येथे शिवसैनिकांचा मेळावा आयोजित केला होता. या प्रसंगी खासदार शिंदे हे उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे देताना उपरोक्त स्पष्टीकरण त्यांनी केले आहे.

बॅनर लावल्याने कोणी खासदार होत नाही

कल्याण लोकसभा मतदार संघातील ठाकरे गटाचे संपर्क प्रमख माजी आमदार सुभाष भोईर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार असे बॅनर लावले. ठाकरे गटाकडून सुभाष भोईर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता त्यातून अधोरेखीत झाली आहे. शिवाय राष्ट्रवादीने कल्याणचीजागा ठाकरे गटाला सोडलीआहे. यावर खासदार शिंदे यांनी सांगितले की, बॅनर लावून कोणी खासदार होत नाही. प्रत्येकाला इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. विरोधकांशिवाय निवडणूकहोऊ शकत नाही. २०१४ साली खासदारकीची निवडणूकीत मीअडीच लाखाच्या फरकाने तर२०१९ सालच्या निवडणूकीतसाडे तीन लाख मतांच्या फरकाने निवडून आलो. मतदार संघाच्या विकासाकरीता हजारो कोटीरुपयांचा निधी आणला.

माझे उत्तर कामातून असेल

संजय राऊत यांनी केलेल्या टिकेला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. यांनी सांगितले की, माझ्यावर टिका करा. माझे उत्तर हे कामातून असेल. आम्ही कधी पातळी सोडलेली नाही. सोडणार ही नाही. महाराष्ट्राची संस्कृती बिघडविण्याचे काम ते करीत असल्याची टिका खासदार शिंदे यांनी केली आहे.