भाकरी फिरवा पण कच्ची राहणार नाही ही काळजी घ्या, भुजबळांना नेमकं सांगायचंय काय?

नागपूर/प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे दोन दिवसीय शिबीर नागपूर येथे होत आहे. या शिबिरामध्ये छगन भुजबळ यांनी केलेलं विधान चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी भुजबळांनी ओबीसी समाजाच्या प्रश्नाविषयी आवाज उठवला. छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसी समाजासाठी काम उभं करण्याची गरज आहे. या समाजासाठीच मी शिवसेना सोडली होती. कारण शरद पवार हे ओबीसींसाठी काम करत होते. ओबीसींसाठी देवेंद्र फडणवीस यांनी कायदा बनवला परंतु तो टिकला नाही. एसीमध्ये बसून त्यांच्या लोकांनी इम्पेरिकल डेटा बनवला. त्यामुळे उपयोग झाला नाही. ओबीसी समाजाची जनगणाना झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत. एससी, एसटी समाजाला निधी मिळतो, तसंच ओबीसींनाही मिळाला पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचं भुजबळ म्हणाले.