पैलवानांच्या शोषणाचं प्रकरण केंद्र सरकार संवेदनशीलपणे हाताळतंय; केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांचा विश्वास

नवी दिल्ली/प्रतिनिधी महिला कुस्तीपटूंनी केलेल्या शोषणाच्या आरोपाचं प्रकरण केंद्र सरकार संवेदनशीलपणे हाताळत असल्याचं केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं. महिला कुस्तीपटूंनी केलेल्या मागणीनुसार या प्रकरणी एक समिती स्थापन करण्यात आली असून तपास सुरु असल्याचंही ते म्हणाले. साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया आणि संगीता फोगाट यांच्यासह अनेक पदकविजेते खेळाडूंनी राष्ट्रीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष खासदार बृजभषण सिंह यांना अटक करावी अशी मागणी करत दिल्लीत आंदोलन करत आहेत.

केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांना कुस्तीपटूंच्या आंदोलनावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, केंद्र सरकार प्रदर्शन करणाऱ्या पैलवानांच्या मुद्द्यावर संवेदनशील आहे. खेळाडूंनी मागणी केल्यानुसार दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्या मागणीनुसार, भारतीय कुस्ती महासंघाने एक समिती नियुक्त केली आहे. ही समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे. कुस्तीपटूंनी असं कोणतंही पाऊल उचलू नये जे खेळ किंवा खेळाडंना नुकसान पोहोचवेल असं आवाहन या आधी अनुराग ठाकुर यांनी केलं होतं.