जिल्हा कारागृह येथे बंदींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

वर्धा/प्रतिनिधी एकात्मिक एसटीआय,एचआयव्ही, टीबी, हेपेटायटीसतपासणी अभियानांतर्गत जिल्हाकारागृह येथे कारागृहातीलबंदींकरीता जिल्हा सामान्यरुग्णालयाच्यावतीने आरोग्यतपासणी शिबिराच आयोजन करण्यात आले होते. शिबिरातबंदींच्या विविध प्रकारच्या तपासण्याकरण्यात आल्या. आरोग्य शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रा.ज. पराडकर यांच्या मार्गदर्शनातघेण्यात आले असून जिल्हाकार्यक्रम अधिकारी नुरुल हकशेख, नितीन साखरे, अमित छल्लाणी, सारिका ढोके, कृष्णा टाटे तसेच क्षयरोग विभागातील सुमंत ढोबळे, संजू सोनटक्के, डॉ. समरान रिजवी, समता फाऊंडेशनचे शाहीना सद शाह, डॉ.मून आदी उपस्थित होते. जिल्हा कारागृह अधीक्षक सुहास पवार व नितीन क्षिरसागर यांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शिबिरात बंदींची आरोग्य तपासणी सोबतच त्वचारोग दि.१५ मे ते १४ जुन या कालावधीत जिल्ह्यातील कारागृह, निरिक्षण गृह, बालगृह, व्यवसनमुक्ती केंद्र, वन स्टॉप सेंटर मधील लाभार्थ्यांची अभियानांतर्गत आरोग्य तपासणी तसेच एसटीआय, एचआयव्ही, क्षयरोग, हॅपआयटीस इत्यादी तपासणी करण्यात येणार आहे. अभियाना दरम्यान लाभार्थ्यांना आजाराबद्दलची माहिती, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, निदान झाल्यावर दिले जाणारे उपचार याबाबत माहिती देण्यात आली. सर्व व गुप्तरोग, एचआयव्ही, सिफिलिस, आराजाचे उपचार जिल्हा सामान्य क्षयरोग, हॅपॅटायटीस इत्यादी तपासणी करण्यात आली. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार तसेच राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम, राष्ट्रीय वायरल हॅपटायटीस यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णालय, वर्धा येथे मोफत दिले जात आहे. तपासणी झाल्यानंतर त्यात संसर्ग असणाऱ्या बंदींना पुढील उपचार मिळवून देण्यात येणार आहे व पाठपुरावा केला जाणार आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.