रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार

मुंबई/प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिष ेकाला ३५० व पूर्ण झाली आहेत. यानिमित्तराज्य शासनामार्फत रायगडावरशिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणारअसून कार्यक्रमासह येथे येणाऱ्या शिवभक्तांच्या सेवेसाठी प्रशासनदेखील सज्ज्ा झाले आहे. शुक्रवार २ जून रोजी सकाळी ८.३० वाजताया सोहळ्याचा उद्घाटनाचा कार्यक्रमहोणार आहे. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण केलेजाणार आहे. या सोहळ्यात १जूनपासून रायगड परिसरात विविधसांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक ्रमास म ुख्यम ंत्र एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय संस्कृती मंत्रीजी. किशन रेड्डी, उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री धीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदयसामंत, रायगड विकास प्राधिकरणचेअध्यक्ष संभाजी राजे छत्रपती तसेचइतर लोकप्रतिनिधी व मान्यवरमोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत. मंगळवार, ६ जून रोजी देखील सकाळी ८.३० वाजतारायगड किल्ल्याच्या परिसरात एकाकार्यक्रमाचे आयोजन करण्यातआले आहे. पाचाड येथे १ ते ६ जून या काळात विविध कार्यक्रमांचेआयोजन करण्यात आले आहे.

गेटवे ऑफ इंडिया येथे “जाणता राजा’ महानाट्याचे आयोजन

याशिवाय, १ जून ते ७ जून या काळात गेटवे ऑफ इंडिया येथेविविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेआयोजन सांस्कृतिक कार्य विभागव पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्रयांच्या संयुक्त विद्यमाने केले आहे.१ जून रोजी “जाणता राजा’ हेमहानाट्य, २ जून रोजी राजस्थानीलोककला, ३ व ४ जून रोजीमहाराष्ट्राची लोककला तसेच ५ ते ७ जून दरम्यान गोवा व गुजरात याराज्यातील लोककलांचे सादरीकरणकरण्यात येणार आहे.

या सोबतच १ ते ७ जून या कालावधीतशिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शनआयोजित करण्यात येणार आहे.३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या विनामूल्य सन्मानिका श्री. शिवाजी नाट्य मंदिर, दादर, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, दामोदर हॉल, परळ, दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली, गडकरी रंगायतन, ठाणे, सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली, आचार्य अत्रे नाट्यगृह, कल्याण, विष्णूदास भावे नाट्यगृह, वाशी, महाकवी कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड, डॉ.काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे, येथे उपलब्ध असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असेल.

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज्ा

छत्रपती शिवाजी महाराजयांचा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा दि.२ व ६ जून २०२३ ी रायगडावर मोठ्या दिमाखसंपन्न होणार आहे. या सोहळ्यास य ेणाऱ्या शिवभक्त जनत ेसाठ अत्यावश्यक सेवा, सोयीसुविधांसहत्यांच्या स्वागत आणि तत्परसेवेसाठी प्रशासन सज्ज्ा झालेआहे. या शिवराज्याभिषेकालाशासनाचे प्रतिनिधी म्हणूनकेंद्र आणि राज्य शासनाचेप्रतिनिधी देखील उपस्थित राहणाआहेत. यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला होणारी शिवभक्तांची प्रचंड गर्दी पाहाता रायगड जिल्हा प्रशासनाच्यावतीने ३३ समित्यांचे गठन करण्यात आले आहे.

शिवभक्तांच्या आरोग्यासाठी सुविधा

नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने राज होळीचा माळ, जगदीश्वरमंदिर, नियंत्रण कक्ष, निवाराकक्ष, आराम कक्ष या ठिकाणी त्याचबरोबर एसटी वाहन चालक, पोलीस, वैद्यकीय पथकांसाठीही मंडप उभारण्यात येत आहेत.शिवभक्तांच्या आरोग्याच्या वसुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने डव्हान्स लाईफ सपोर्ट सुविधाअसणाऱ्या ४ तर बेसिक लाईफ सपोर्ट सुविधा असणाऱ्या १६ब्म्युलन्स सज्ज्ा ठेवल्या आहेत. पार्किंग, गड पायथा, पायरीमार्गावरप्रत्येकी ३०० मीटर अंतरावर आणिगडावर आरोग्य अधिकारी, तज्ञ डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेवक,पुरेसा औषधसाठा यासह एकूण२४ वैद्यकीय पथकांच्या माध्यमातून१०४ डॉक्टर्स व ३५० आरोग्यकर्मचारी दिवस-रात्र सज्ज्ा ठेवण्यातआले आहेत.

सोहळ्यावर राहणार सीसीटीव्ही, ड्रोनचे लक्ष

सोहळ्याला होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी ध्वनिक्षेपकयंत्रणा, पब्लिक अनाऊन्समेंटटम, वॉकी टॉकी, हॅम रेडिओ,पोर्टेबल साऊंड, सर्च लाईट,वीज अटकाव यंत्रणा आदिधन-साहित्यांची उपलब्धताण्यात आली आहे. यासहसीसीटीव्ही, ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण सोहळ्यावर बारीक लक्षठेवले जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठीप्रशासनाशी तात्काळ संपर्कसाधण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येत आहे.

अग्निशमन व्यवस्था सज्ज्ा पार्किंग, बस डेपो, गड पायथा,गडावरील सर्व मंडप, भोजन कक्ष अशा सर्व आवश्यक ठिकाणी एकूण चार अग्निशमन वाहने सज्ज्ा ठेवण्यात येणार आहेत.

शिवभक्तांच्या वाहनांकरिता वाहनतळ व्यवस्था; एसटीच्या १५० बसेस तैनात संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्यामार्गांनी रायगड किल्ल्याकडे येणाऱ्याशवभक्तांसाठी सोयीस्कर वाहनतळव्यवस्था करण्यात आली आहे. कोल्हापूर, सातारा, महाबळेश्वर, पोलादपूर महाड नातेखिंड या मार्गानेयेणाऱ्या वाहनांकरिता कोंझर पार्किंगक्रमांक एक व कोंझर पार्किंगक्रमांक दोन, वालसुरे पार्किंग येथे व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई, पेण, कोलाड, माणगाव, धनगर फाटा, कवळीचा माळतसेच पुणे, ताम्हाणी,निजामपूर मार्गेणाऱ्या शिवभक्तांच्या वाहनांकरिपार्किंग व्यवस्था ही कवळीचामाळ आणि पाचाड बौद्धवाडीशिवसृष्टीच्या मोकळ्या जागेकरण्यात आली आहे. वाहने या ठिकाणी ठेवल्यानंतर शिवभक्तांना ने-आण करण्यासाठी वाहनतळ तेपाचाड नाका या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या मोफत१५० बसेस उपलब्ध करण्यातयेत आहेत. रायगड जिल्हा प्रशासनातर्फेमंडप, वीजपुरवठा, गर्दी नियंत्रण, अग्निशमन, वैद्यकीय सुविधा,पिण्याचे व वापरावयाचे पाणी,ोजन, स्नानगृह व शौचालयस्वच्छता, कचरा, परिवहन,पार्किंग, रोप-वे, रस्ते, मोबाईल नेटवर्क, पोलीस बंदोबस्त,सांस्कृतिक कार्यक्रम, किल्ल्याचे सौंदर्यीकरण, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध बाबींचे नियोजन करण्यात आले आहे.