धर्मनिरपेक्ष राष्ट्राला धर्मवादी बनविण्याचे प्रयत्न सुरु आहेत- पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात

वर्धा/प्रतिनिधी अलीकडे मोठ्या प्रमाणात सरकारीकार्यक्रमांमधून केले जाणारे ब्राम्हणीधार्मिक कर्मकांड, डार्विनच्या सिद्धांतासारख्या विज्ञाननिष्ठ बाबी वगळून शालेय अभ्यासक्रमातून, पुस्तकांतून आणलाजात असलेला ब्राह्मणवाद, लोकशाहीला, राष्ट्राला दिला जात असलेला ब्राह्मणवादी तत्वांचा आधार पाहता सध्या भारतीयराज्यसत्ता करीत असलेले काम हे भारतीय संविधानाच्या विरुद्ध जात असून धर्मनिरपेक्ष राष्ट्राला धर्मवादी बनविण्याचे प्रयत्न केले जातअसल्याचे दिसत आहे असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष व विचारवंतपद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.येथील रमाई फाउंडेशनच्यावतीने आयोजित रमाई स्मृतिदिन – २०२३ व्याख्याना प्रसंगी देशातील सद्यस्थिती, धर्मनिरपेक्ष राष्ट्र वराजकीय लोकशाहीचे भवितव्य या विषयावरसत्य नारायण बजाज सार्वजनिक वाचनालय सभागृह, वर्धा येथे ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्राचार्य बाबा हातेकर, धुळे व प्रमुख उपस्थिती युवासामाजिक कार्यकर्त्या कु. वनश्री वनकर यांचीहोती. पुढे बोलताना डॉ. थोरात म्हणाले की, भारत एक धर्मनिरपेक्ष देश असूनप्रत्येकाला व्यक्तिगत जीवनात आपापल्या धर्म तत्वानुसार जगण्याचे, त्याचे संवर्धन, जतन, प्रचार आणि प्रसार करण्याचे स्वातंत्र्यराहिल परंतु राज्याचा विशेष असा कोणताहीधर्म नसेल, राजकीय व्यवहार कोणत्याही धर्माच्या प्रभावात नसेल, तसेच सर्वांना समान संधीचे स्वातंत्र्य अबाधीत असेल, लोकशाही मार्गाने आपले प्रातिनिधिक प्रतिबिंब स्थापित करता येईल, असे भारतीय संविधानात नमुद आहे. असे असुनही आज जर संविधानिक आंबेडकरांचा जीव मात्र रमाईमध्ये गुंतला होता. ही बाबासाहेबांची रमाई वरील निष्ठा अत्यंत महत्त्वाची होय. त्यामुळे रमाई प्रमाणे त्यागाची जशी अपेक्षा आपण स्त्रियांकडून करतो तशीच आ ंबेडकरा ंप्रमाण े पत्नी लोकशाही मार्गाने निवडून येणारं सरकार जर निष्ठता आंबेडकरी चळवळीतील पुरुषांमध्ये एका विशिष्ट धर्माच्या तत्त्वाला प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध दिसत असेल तर आपण प्रतिक्रांतीच्या युगात जगत आहोत, परिणामतः लोकशाहीचे भवितव्य अंधकारमय आहे. तेव्हा संविधानप्रेमींनी याबाबत सजग राहून संघर्ष करण्याची गरज आहे असेही ते म्हणाले. याप्रसंगी रमाईंना अभिवादन करतांना वनश्री वनकर म्हणाल्या की, विदेशात आंबेडकरांच्या विद्वत्तेने प्रभावित अनेक महिला आंबेडकरांच्या भोवती असतानांही येण्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे. याप्रसंगी अध्यक्षीय समारोप करतांना प्रा. बाबा हातेकर म्हणाले की, अलीकडे आपल्या देशात भारत आणि हिंदुस्तान असे दोन देश दिसत असून आपल्या देशाला भारत म्हणणाऱ्यांना धर्मनिरपेक्षवादी तर हिंदुस्तान म्हणणाऱ्यांना हिंदुत्ववादी देश हवा आहे. कार्यक्रमारंभी प्रमुख पाहुण्यांचे हस्ते माता रमाईंच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. रमाई फाऊंडेशनच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सन्मानचिन्ह, शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उच्च शिक्षणासाठी लंडन विद्यापीठामध्येसिलेक्शन झाल्यामुळे वनश्री वनकर यांना पाहुण्यांचे हस्ते सन्मानचिन्ह, शॉल वपुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच नालंदा एकॅडमीचे संचालक अनुपकुमार सर यांचा सुध्दा पाहुण्यांचे हस्ते सत्कार करण्यातआला. कार्यक्रमाचे संचालन प्रा.ज्ञानेंद्र मुनेश्वरयांनी तर प्रास्ताविक सरिता पखाले यांनी केले आभार प्रदर्शन रविंद्र जिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुधीर भगत, हेमंत जवादे, सिध्दार्थ कांबळे, दिनेश भगत,डॉ. महेंद्र पखाले, डॉ. सुनिल तोतडे, डॉ. सचिन लोखंडे, अशोक कांबळे, अरविंद झांबरे, मिलिंद साखरकर, राहुल हलुले,रविकांत पाटील, विलास कांबळे, राजाभाऊढाले, राष्ट्रपाल थुल, राजु लभाने, दिनेश थुल, दिनकर वासेकर, दिपचंद जुमडे, मोहनधाबर्डे, ताराचंद भगत, मंगेश नगराळे, विक्रांतभगत, अविनाश ढेपे, कुणाल भगत, मिलिंद गायकवाड, छत्रपाल धाबर्डे, सुनिल जवादे, र्षल थुल, शुभांगी भगत, माधुरी साखअंजली कांबळे, माया कांबळे,कविताथुल, रंजना झांबरे, प्रिया शंभरकर, कल्पना ताकसांडे, डॉ. वंदना पुंडकर, कृतिकाथुल, श्रृती हलुले, मोनिका पखिड्डे, उषा खडतकर, वर्षा जिंदे, शालीनी लभाने, अर्चनाकांबळे, पल्लवी हलुले, जया भगत, भार्गवी भगत, तन्वी कांबळे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी वर्धेतील प्रतिष्ठीत मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी यांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती होती.