शेतकऱ्यांनी ३० जूनपुर्वी आपल्या खात्याचे नविनीकरण करून घ्यावे- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

वर्धा/प्रतिनिधी शेतकऱ्यांना दरवर्षी दिल्याजाणाऱ्या पिककर्जाची विहितमुदतीत परतफेड करणे आवश्यक आह े. परतफ ेड न झाल्यास शेतकऱ्यांना पुढील वर्षी कर्जउपलब्ध होण्यास अडचणी निर्माणहोण्यासोबतच कर्जावरील व्याजसवलत योजनेस मुकावे लागू शकते.त्यामुळे शेतकऱ्यांनी विहीत मुदतीतआपले खाते नविनीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. विविध बँकांच्यावतीने शेतकऱ्यांना दरवर्षी पिककर्जाचेवाटप केले जाते. या अल्पमुदती पिककर्जाची परतफेड दरवर्षी विहीतमुदतीत म्हणजे कर्ज घेतल्यापासून ३६५ दिवस किंवा ३० जूनपुर्वी करावी लागते. या मुदतीतकर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनानवीन वर्षासाठी पुन्हा कर्ज दिले जाते.

मुदतीत परतफेड न केल्यास कर्जखाते थकीत होते. अशा थकीतखातेधारकांना बँका पिककर्ज देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचणहोते. त्यामुळे मुदतीत कर्जाचीपरतफेड करून खात्याचे नविनीकरणकरणे आवश्यक असते. खाते नविनीकरण केलेल्याशेतकऱ्यांना पिककर्जासह प्रधानमंत्रीपिकविमा योजनेचा लाभ घेतायेतो. खाते नविनीकरण झाल्यानंतरपंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ उपलब्ध होतो. या योजनेंतर्गत ३ लाखापर्यंतचे कर्ज शुन्य टक्के व्याजदरावर शेतकऱ्यांना उपलब्ध होते. नवीन पिककर्जाच्या दरानुसार वाढीव कर्ज घेण्यास शेतकरी पात्र होतात.

यासोबतच शेतकऱ्यांचा सिबील रिपोर्टसुध्दा चांगला राहतो. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्ज घेण्यासाठी बँकांकडे पत चांगली राहते. कर्जखाते नविनीकरण केलेल्या शेतकऱ्यांना बँकांच्या इतर कर्ज योजनांचा देखील लाभ घेता येतो. त्यात कृषी वाहन योजना, शेती तारण योजना, फळबाग, फुलबाग, हरितगृह, शेडनेट योजना, शेळीपालन, पशुपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, कृषि यांत्रिकीकरण, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी येत्या दि.३० जुनपूर्वी आपल्या मागील पिककर्जाची परतफेड करून खाते नविनीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

वर्षनिहाय नविनीकरण झालेले खाते

दरवर्षी मोठ्या प्रमाणावरशेतकरी पिककर्जाची उचल करूनमुदतीत परतफेड करतात आणिआपल्या खात्याचे नविनीकरणकरून घेतात. सन २०१७-१८यावर्षी १३ हजार ४९२ शेतकऱ्यांनीखात्याचे नविनीकरण केले. सन २०१८-१९ मध्ये ९ हजार १४७ खाते, सन २०१९-२० मध्ये १४ हजार ७७२ खाते, सन २०२०-२१मध्ये १३ हजार ३७५ खाते, सन २०२१-२२ मध्ये ३८ हजार २९९ तर गेल्यावर्षी सन २०२२-२३ मध्ये तब्बल ४३ हजार ७६ शेतकऱ्यांनीआपल्या कर्ज खात्याचे नविनीकरणकेले आहे.