सिंदीत भीषण पाणी टंचाई, दुसरीकडे पाण्याची नासाडी!

सिंदी रेल्वे/प्रतिनिधी येथील पाणीपुरवठा योजना नेहमी वादाच्या भोवर्यात सापडलीअसते. पंधरा दिवसांपासून जनतापाण्यासाठी कासावीस झालीआहे. पण, कोणाला त्याचे सुतकनाही. दुसरीकडे नियोजनाअभावीकांढळी मार्गावर प्रगती इंग्लिश स्कूलच्या प्रवेशद्वाराजवळ घाण पाण्याचे डबके जमा झाले आहे. शहारातील १५ हजारनागरिकांना सध्या चवथ्या दिवशीकसेबसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येते. परंतु, पाणी पुरवठा कधी व कोणत्या वार्डात होईल समजतच नाही. ज्यांनासकाळी सहाला पाणी मिळणार अशी अपेक्षा असते व सांगितले जाते त्यांना १८ तासांनी पाणी पुरविल्या जाते. मजूर घरी नसतानापाणी घेणार कोण? याचा पाणी पुरवठा विभाग किंवा काळजीवाहूमुख्याधिकार्यांनी विचार करायल नको का? असा सवाल महिलांनीउपस्थित केला आहे.

शहराला ९ किमी अंतरवरील वाकसूर शिवारातून निरंतर पाणी मिळावे, अशी तरतूद तीन दशकांपूर्वी ना. गडकरी यांनी केली होती. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने एक्स्प्रेस फिडर उपलब्ध करून देण्यासाठी आ. प्रमोद शेंडे यांनी भरपूर निधी दिला होता. तरीही वीज नव्हती! ही लंगडी सबब पुढे केल्या जात आहे. नामांकित कंपनीच्या ३० अश्वशक्तीच्या मोटारी काढून तकलादू पंपसेट लावणारे व पाण्याचे मीटर जनतेच्या माथी मारणारे गप्पकसे? हा सिंदीकरांचा सवालआहे. भर उन्हाळ्यात दरवर्षी ही समस्या उग्र रूप घेते, हे पालिकाप्रशासनास कळत नाही का? अपुरेपाणी मिळत असताना जनतेला अतिरिक्त पाण्याचे पैसे मागताना प्रशासनास काहीच कसे वाटत नाही? शिवाय वारंवार तक्रारकरूनही प्रगतीच्या पुढे असलेल्यात्या डबक्याचा सोक्षमोक्ष कधी लावता असा संतप्त प्रश्न शाळेचे संचालक लक्ष्मण डकरे व इतरांनीउपस्थित केला आहे.