नितीन गडकरी यांच्या वाढदिवशी ७ शाळांना आ.डॉ. पंकज भोयर यांनी दिले म्यूजिक स्टूडियो

वर्धा/प्रतिनिधी संगिताच्या माध्यमातून ईश्वराशी संवादसाधल्या जातो. मानसाच्या जीवनातउर्जा निर्माण करण्याचे कार्य करते. बाल दशेपासून मुलांमध्ये संगिताची आवड निर्माणकरणे गरजेचे आहे. परंतु, शाळेत साहित्य नसल्याने विद्यार्थ्यांना संगिताचे धडे देताना शाळांना अनेक अडचणी येतात. आ. पंकजभोयर यांनी आपल्या विकास निधीतूनवर्धा व सेलू तालुक्यातील सात शाळांना संगिताचे साहित्य भेट देत अभिनव उपक्रमराबवला. नितीन गडकरी यांना संगीताची विशेष आवड आहे. त्या संगीताची आवडवर्धेकर विद्यार्थी या निमित्ताने जोपासतील असा विश्वास आ. पंकज भोयर यांनीव्यक्त केला. नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेलू येथील दीपचंद चौधरीविद्यालय, वर्धा येथील रत्नीबाई विद्यालय,सुशिल हिंमतसिंगका विद्यालय, स्वावलंबी विद्यालय, लोक विद्यालय, केसरीमल कन्या विद्यालय व न्यू इंग्लिश हायस्कूललासंगीत वाद्य उपलब्ध करून देण्यात आले.

न्यू इंग्लिश हायस्कूल मध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस तर उद्घाटक म्हणून भाजपाचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी सचिन जगताप, वर्धा एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रदीप बजाज, प्राचार्य कुळकर्णी, अनघा आघवन, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्ष वैशाली येरावार आदी उपस्थित होते. यावेळी खा. रामदास तडस म्हणाले की, कला व क्रीडा क्षेत्राचा विकास होणे गरजेचे आहे. शिक्षकांनी आणखी जोमाने कार्य करून या क्षेत्रात जिल्ह्याचे नावउज्ज्वल व्हावे, यासाठी प्रयत्न करावे, असेआवाहन त्यांनी केले. उपेंद्र कोठेकर म्हणाले,वर्धा जिल्हा संगीत क्षेत्रात देखील आपली छाप सोडणार्या नामवंताचा जिल्हा आहे. जिल्ह्यातील अनेकांनी महान व्यक्तीसोबत कार्य केले आहे. व्यक्ती केवळ बौद्धीक ज्ञानाने परिपुर्ण होत नाही तर त्याला १४ विद्या व ६४ कला देखील अवगत असल्यापाहिजे. तरच तो परिपुर्ण होतो, असेही ते म्हणाले.

आ. पंकज भोयर म्हणाले की, संगीत क्षेत्रातील तपस्वींचा सत्कार होत आहे. हा आनंदाचा क्षण आहे. या तपस्वीमुळे जिल्ह्याचे नाव संगीत क्षेत्रात कोरल्यागेले आहे. नवीन पीढित देखील संगीत क्षेत्रातील नामवंत उदयास यावे, यासाठी संगीत साहित्य शाळांना वाटप करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.न्यू इंग्लिश शाळेने जागा उपलब्ध करून दिल्यास गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने संगीत कक्ष सुरू करू, असे आश्वासनत्यांनी दिले. यावेळी शिक्षणाधिकारीसचिन जगताप यांनी या उपक्रमाची स्तुती केली. आपले आयुष्य संगीत क्षेत्रासाठी वाहून देणारे शहरातील नामवंत संगीतविशारदांचा शाल, श्रीफळ व गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य कुळकर्णी यांनी, संचालन शेगावकर व संदीप चिचाटे यांनी तर आभार प्राचार्य अनघा आघवन यांनी मानले.