अभाविप चे गोल्डन पिक्स समर कॅम्प उत्साहात संपन्न

वर्धा/प्रतिनिधी उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला व गुणांना विकसित करण्याच्या हेतूने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वर्धा शाखेद्वारे आयोजित द बिगीनिंग्स ऑफ गोल्डन पिक्स समर कॅम्प दि २७ मे ला वर्ध्याजवळील वसुंधरा ऍग्रो टुरिज्म वॉटर पार्क याठिकाणी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. दि २५ रोजी उदघाट्न होऊन दि २७ मे ला या समर कॅम्प चा समारोप झाला या समारोपीय सत्रात अभाविप च्या विकासार्थ विद्यार्थी (एसएफडी) गतिविधीचे राष्ट्रीय सहसंयोजक मयूर जव्हेरी तसेच विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राजेश लेहकपुरे त्याच प्रमाणे एसएफडी चे विदर्भ प्रदेश संयोजक निलय बोन्ते यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी मयूर जव्हेरी व निलय बोन्ते यांनी पर्यावरणाच्या संतुलनाकरिता एसएफडी ची भूमिका मांडून पर्यावरणाबद्दल आपल्या संवेदना मांडल्या. यावेळी प्रा. लेहकपुरे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या समर कॅम्प मध्ये विद्यार्थ्यांचे तीन गटात विभाजन करून विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये सेल्फ इंट्रोडक्शन, मशाल सत्र, मूवी नाईट, खजिना शोध, प्रातः भ्रमण, ट्रेकिंग, प्रश्नोत्तरी, मनोरंजन सत्र, मेडिटेशन, अनुभव कथन तसेच भारतीय इतिहास व भारतीय संस्कृती या विषयांवर चर्चासत्र सुद्धा आयोजित केले होते. अनुभव कथन सत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादावर प्रतिक्रिया देत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भविष्यात पुन्हा अशाच समर कॅम्पचे आयोजन करणार असल्याचे आश्वासन शिबीर संयोजक यश दोड यांनी दिले.