…२०१९ मध्ये पालापाचोळ्यासारखे उडून गेले!; मुख्यमंत्री शिंंदेंची विरोधकांच्या एकजुटीवर खोचक टीका

मुंबई/प्रतिनिधी नवीन संसद भवन इमारतीचे आज, २८ मे रोजी उद्घाटन करण्यात आलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्यावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्यात आला होता. उद्घाटन कार्यक्रमावरून सत्ताधारी पक्ष आणिविरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यादरम्यान विरोधकांनी नवीन संसद भवन इमारतीच्या उद्घटनाच्या कार्यक्रमावर टाकलेला हा बहिष्कार हा दुर्दैवी असल्याचे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंकी, या कार्यक्रमासाठी सगळ्यांना निमंत्रण पाठवलं होतं, तेथे सगळे होते. सर्व जातीपाती-धर्माचेलोक कार्यक्रमाला होते. कोणालाही डावलण्यात आलं नाही. पण कावीळ झालेल्या लोकांना सगळं पिवळं दिसतं. आजच्या या कार्यक्रमात सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहीजे होतं पण दुर्देव आहे असे शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

देशात लोकशाही टिकवायची असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवं असे आवाहन उद्धवठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना शिंदे म्हणाले की, लोकशाहीचं हे पवित्र मंदिर आहे. लोकशाही टिकवायची असेल तर त्यांनी सहभागी व्हायला हवं होतं. सगळे एकत्र?२०१९ ला देखील सगळे एकत्र आले होते. पण पालापाचोळ्यासारखे उडून गेले. २०१४ पेक्षा २०१९ ला मोदी साहेबांच्या नेतृत्वात जास्तीच्या जागा आल्या.२०२४ ला देखील सगळे रेकॉर्ड मोडतील. १४० कोटी जनता मोदींच्या पाठिशी आहेत. २०२४ ला सगळे रेकॉर्ड मोडतील असे एकनाथ शिंदे म्हणाले.