मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई/प्रतिनिधी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (चडठऊउ) मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर हेलिपॅड बांधण्यात येणार आहेत. या महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे.समृद्धी महामार्गावर होणारे अपघात आणि अपघातांनंतर संभाव्य आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी हे हेलिपॅड बांधण्यात येणार आहेत. प्रस्तावित आराखड्यानुसार, पहिले हेलिपॅड खर्डी ते इगतपुरी दरम्यान एक्स्प्रेस वेच्या बोगद्या विभागाजवळ असेल, ज्याचे सध्या बांधकाम सुरु आहे. समृ्द्धी महामार्गालगत १६ हेलिपॅड बांधण्यात येणार आहेत. समृद्धीवर अपघातांची संख्या वाढत आहे.

तेव्हा दुर्घटना घडल्यास जखमींना एअर ॲम्ब्युलन्सने रुग्णालयात दाखल करता येणं शक्य होईल. जखमींवर तात्काळ योग्य उपचार मिळतील या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलाय. भविष्यात हेलिपॅडची संख्या वाढवून २२ वर नेण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, चडठऊउ ने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर एअर ॲम्ब्युलन्स सुविधा स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले होते आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गासाठी अशीच योजना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. मुंबई-नागपूर द्रुतगती मार्ग, शिर्डी आणि भरवीर दरम्यान ८० किमी पसरलेले, जे इगतपुरी आणि नाशिक दरम्यान आहे. या विकासामुळे, ७०१ किमी द्रुतगती मार्गापैकी एकूण ६०० किमीचा रस्ता वाहनांच्या वाहतुकीसाठी उपलब्ध झाला आहे. नागपूर ते शिर्डी दरम्यानचे उद्घाटन ११ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आले.