राष्ट्रवादी काँग्रेसचा अरविंद केजरीवालांना पाठिंबा; भेटीनंतर शरद पवारांनी केले जाहीर

मुंबई/प्रतिनिधी एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी पक्षांना एकत्रित करण्यासाठी आणि विरोधकांची मोठी फळी उभारण्याचा प्रयत्न केला जात असताना, दुसरीकडे केंद्र सरकारने काढलेल्या एका अध्यादेशासंदर्भात विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान मुंबई दौऱ्यावर आले आहेत. उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. अरविंद केजरीवाल, भगवंत मान यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

या भेटीनंतर अरविंद केजरीवाल, भगवंत मान आणि शरद पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत, याबाबत आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अरविंद केजरीवाल यांच्या पाठिशी असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, शरद पवार यांचे मनापासून आभार मानतो. केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा मुद्दा शरद पवार यांच्यासमोर मांडला. दिल्लीत आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच केंद्र सरकारने लगेचच दिल्ली सरकारच्या अधिकारावर नियंत्रण आणणारा अध्यादेश काढला. याविरोधात गेली ८ वर्ष आम्ही लढलो. सर्वो च्च न्यायालयात आमच्या बाजूने निकाल लागला. मात्र, लगेचच परंतु या निर्णयानंतर अवघ्या आठच दिवसात केंद्र सरकारने नवा अध्यादेश काढून आमचे अधिकार हिरावले.

हा दिल्लीकरांवर मोठा अन्याय होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या संघर्षाचा परिणाम दिल्लीच्या विकासावर होत आहे. राज्यसभेत याविरोधात मतदान केल्यास संपूर्ण देशाला याचा फायदा होऊ शकतो. विरोधकांनी एकत्रपणे मतदान केल्याचा लाभ ीकरांना मिळेल. हा मुएखाद्या पक्षाचा किंवा विरोधकांचानाही. हा मुद्दा देशाचा आहे.देशाबाबत आदर असलेल्या पक्षांनीएकत्र येऊन याचा विरोध करायलाहवा, असे अरविंद केजरीवालयांनी सांगितले. शरद पवारांनी आम्हालाआश्वासन दिले आहे की,राज्यसभेत हे विधेयक पारितदेणार नाही. त्यामुळे बिगर भाजपा पक्ष एकत्र आले तर हे विधेयक नामंजूर होऊ शकते.

बिगर भाजपा सरकार एखाद्याराज्यात आले तर भाजपचे केंद्र सरकार तीन गोष्टी करते. एकतर विरोधी पक्षाच्या सरकारमधीलआमदारांना खरेदी करूनभाजप ते सरकार पाडते आणि स्वत:चे सरकार तयार करते.दुसरे म्हणजे ईडी-सीबीआयला पाठवून विरोधी पक्षाच्यासरकारमधील आमदारांनाधमकावून पक्षात फूट पाडूनसरकार पाडते आणि आपलेसरकार बनवते आणि तिसरे म्हणजेआमदार विकले किंवा घाबरले नाही तर राज्यपालांकरवी अध्यादेशआणून त्या सरकारला काम करू दिले जात नाही. ही देशासाठी धोकादायक स्थिती आहे.महाराष्ट्रातील जनता तर यामुळेच पीडित आहे. काही महिन्यांपूर्वी ईडी-सीबीआयकरवी आमदारांनाफोडून सरकार पाडण्यात आले, घणाघाती टीका अर िंकेजरीवाल यांनी केली.