बी.डी. भोंगळ कारभारा विरोधात अभाविपचे आंदोलन

वर्धा/प्रतिनिधी सेवाग्राम येथील बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रशासनाचा भोंगळपणा निदर्शनात आल्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्रमक पवित्रा घेऊन विद्यार्थी हितार्थ आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारला. महाविद्यालयात आम्ही काहीच शिकवणार नाही. परंतु, तुम्ही आपली परीक्षा द्या अशाप्रकारे विद्यार्थ्यांना वार्यावर सोडून देत महाविद्यालयाचा भोंगळ कारभार निदर्शनात येताच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाली. नागपूर विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमातील चतुर्थ सत्राच्या परीक्षा १९ जून २०२३ ला अर्थात अगदी महिन्यावर आल्या आहेत. मात्र महाविद्यालयात एकही वर्ग झाला नसल्याने विद्यार्थी मानसिक तणावाला समोर जात आहे.

याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत गंभीरता घेत अपूर्ण अभ्यासक्रम लवकर शिकविण्यात यावा तसेच अन्य विद्यार्थी निगडित समस्यांसंदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जवळपास ६ तास तीव्र आंदोलन करित महाविद्यालयाकडून संपूर्ण मागण्या मंजूर करून घेतल्या. गेल्या कित्येक दिवसांपासून बी. डी. अभियांत्रिकी महाविद्यालयाद्वारे शिकविण्यात हलगर्जीपणा हा ेत असून यात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ मांडला असल्याचे जिल्हा संयोजक वैभव राऊत म्हणाले.

मुळात महाविद्यालय हे विद्यार्थ्यांचे असते त्यामुळे येथील संपूर्ण व्यवस्था सुद्धा विद्यार्थी केंद्रित बंधनकारक आहे. परंतु, या महाविद्यालयात विद्यार्थ्यांनाच दुर्लक्षित केल्या जात आहे. अशाप्रसंगी अभाविप कदापि शांत बसणार नाही, असे साहिल इंगळे म्हणाले. यावेळी जिल्हा संयोजक वैभव राऊत व प्रदेश एस.एफ.डी सहसंयोजक साहिल इंगळे यांसह वर्धा नगरमंत्री हर्ष वानखेडे, वर्धा नगरसहमंत्री सुजान चौधरी, सेलू नगरमंत्रीभरत यादव, मृणाल नेटके, तेजस उमाटे, अमित येळणे, शिवा डुकरे व अभाविप कार्यकर्त्यांसह मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.