दुचाकी चोरास शहर पोलिसांच्या बेड्या

वर्धा/प्रतिनिधी शहरातील आनंदनगर भागातून दुचाकी चोरून नेणाऱ्या चोरट्याला शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या व चोरलेली दुचाकी जप्त केली. तक्रार नोंदविणाऱ्या व्यक्तीने १७ मे च्या रात्री एमएच ३२ एएन ३०७१ क्रमांकाची दुचाकी घराजवळ लॉक करून ठेवली होती. रात्री १२ वाजताच्या सुमारास त्यांनी नियोजित ठिकाणावर उभी असल्याचे पाहीले. १८ मेच्या पहाटे त्यांना दुचाकी नियोजित ठिकाणावर आढळली नाही. सर्वत्र शोध घेतला असता दुचाकी मिळून आली नाही. ती चोरीला गेल्याची तक्रार शहर पोलिसांकडे नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून प्रकरण तपासावर ठेवले.

गुन्हे शोध पथकाने गुप्त माहितीच्या आधारावर आरोपी शाहरुख किशोर खडसे (२९) रा. आनंदनगर, लाला लचपतराय शाळेजवळ, वर्धा याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. एमएच ३२ एएन ३०७१ क्रमांकाची दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याचेजवळून २५ हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करून गुन्हा उघडकीस आणला व आरोपीस अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी व वर्धा शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या निर्देशानुसार गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, जमादार नितीन रायलकर, किशोर पाटील, दिनेश तुमाने, अनुप राऊत, राधाकिसन घुगे, राहुल भोयर, दिनेश आंबटकर, शाम सलामे यांनी केली.