२८ मे रोजी दुपारी १२ वाजता पंतप्रधान मोदी करणार नवीन संसद भवनाचे उद्घाटन

नवी दिल्ली/प्रतिनिधी नवीन संसद भवनाच्या द्घाटनाची तारीख आणि वेळ अखेर ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ मे, रविवारी दुपारी १२ वाजता नव्याने बांधलेल्या संसद भवनाचे उद्घाटन करतील. यासाठी सकाळपासूनच विधीवत पुजेला स ुरुवात हा ेइर् ल. नवीन संसद भवनाच्या बांधकामासाठी सुमारे १२०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. नवीन इमारतीत अनेक प्रकारच्या हायटेक सुविधाही देण्यात आल्या आहेत. याच्या हॉलमध्ये १२२४ खासदारांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासंदर्भात निमंत्रण पत्रिकाही समोर आली आहे. २८ मे रोजी दुपारी १२ वाजता नवीन इमारतीचे लोकसभा आणि राज्यसभेने केंद्र सरकारला नवीन इमारती बांधण्याची विनंती केली होती. त्यानंतर १० डिसेंबर २०२० रोजी पीएम मोदींनी नवीन इमारतीची पायाभरणी केली. नवीन इमारतीच्या बांधकामाची निविदा टाटा प्रकल्पाला देण्यात आली आहे.

सुरुवातीला याची किंमत ८६१ कोटी रुपये निश्चित करण्यात आली होती, मात्र नंतर ती वाढून १२०० कोटी रुपये झाली. संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाची चर्चा सुरू होताच काँग्रेससह विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला हवे, असे विरोधकांचे म्हणणे आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करून संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला हवे, पंतप्रधानांच्या हस्ते नाही, असे म्हटले. नवीन संसद भवनाबाबत काँग्रेसकडून सुरू असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने सोमवारी काँग्रेसवर नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून विनाकारण वाद निमा उद्घाटन पीएम मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचे कार्डमध्ये सांगण्यात आले आहे. निमंत्रण पत्रिकेवर नवीन संसद भवनाचे चित्र छापलेले आहे. कार्डवर सर्व पाहुण्यांना सकाळी ११.३० पर्यंत कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास सांगितले आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी र् ण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.