आर्वीकरांचा रोज छळ; वाट खडतरच!

आर्वी/प्रतिनिधी शहरातील भूमिगत गटार योजनेने आतापर्यंत नवीन भागातील कॉलनीतील रस्त्यांची वाट लावली होती. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसाते जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीची वाट लावून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने लोकांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. भूमिगत गटार योजनेचे काम तसेच जीवन प्राधिकरणाचे काम अधिकार्यांनी वार्यावर सोडलेले दिसून येते. तीन वर्षांपासून भूमिगत गटार योजनेचे काम शहरात सुरू आहे. आतापर्यंत नवीन कॉलनीतील रस्त्यांची वाट लावल्यानंतर सध्या वसंतनगर, गजानननगर, तायडे लेआऊट, राधाकृष्णनगर या भागामध्ये गटार योजनेचे काम सुरू आहे. सरवरी ळिशि हे काम सुरू असताना जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी गेल्याची कल्पना असताना कोणत्याही प्रकारची खबरदारी न घेता गटर योजनेचे काम केल्यामुळे वसंतनगरमधून राधाकृष्णनगरकडे जाणारी जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी फुटली.                                                          त्यासंबंधीची कल्पना जीवन प्राधिकरणच्या अधिकार्यांना दिल्यानंतर चार दिवसापासून थातूरमातूर उपाय केले जात असल्यामुळे हजारो लिटर पाणी रोज वाया जात आहे. परिणामी, परिसरातील नागरिकांना पिण्याकरताही पाणी मिळत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची काय महत्त्व असते हे माहीत असूनही हजारो लिटर पाणी अधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळे व गटर योजनेच्या कामाकडे तसेच जीवन प्राधिकरणाच्या कामाकडे अधिकार्यांचे असलेले दुर्लक्ष यामुळे त्या भागातील लोकांना उन्हाळ्याच्या दिवसात पाणी टंचाई ला सामोरे जावे लागत आहे. सरवरी ळिशि शहरातील भूमिगत गटार योजनेच्या नियंत्रणाची जबाबदारी जीवन प्राधिकरणाकडे असताना जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्यांचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. तक्रारी करूनही अधिकारी त्याची कोणतीही दखल घेत नाहीत. गजानननगर, तायडे लेआऊट येथील संपूर्ण रस्ते फोडून ते काम अर्धवट ठेवले तर राधाकृष्णनगर येथील कामाला सुरुवात केली.

एकही काम पूर्ण न करता त्या भागामध्ये असलेल्या रहिवाशांना जाण्याकरताही अनेक अडचणी निर्माण होत आहेत. मातीचे ढिगारे पडून आहे तक्रारी करूनही ठेकेदार अथवा जीवन प्राधिकरणाचेअधिकारी सुद्धा या बाबीची दखलघेण्यास तयार नाही. तीन वर्षांपूर्वी या भूमिगत घटकयोजने करता ज्या ज्या कॉलनीतीलरस्ते फोडण्यात आले ते अजूनही तसेच असल्यामुळे पावसाळ्यातत्या भागातील रहिवाशांना त्राससहन करावा लागतो व आतानव्याने पुन्हा त्याच प्रकारचे रस्ते फोडले असल्यामुळे त्या भागातीललोकांचा पावसाळा पुन्हा त्याच खडतर प्रवास करावा लागणारआहे. शहरामध्ये विकासकामाकरता निधी मोठ्या प्रमाणावर येत आहे.

मात्र, ज्या योजना आणण्यातयेत आहे त्या योजनेकडे प्रशासनाचेव राज्यकर्त्याचे पूर्णतः दुर्लक्षअसल्याचे दिसून येते. त्यामुळेआलेल्या योजना या लोकांच्यासुविधे करता की लोकांना त्रास देण्याकरता असा प्रश्न विचारण्यात येत आहे.