हिंगणघाटात आयपीएल जुगार अड्यावर छापा, बुकीस अटक

वर्धा/प्रतिनिधी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने हिंगणघाट येथील सिंदी कॉलनीत एका घरी सुरू असलेल्या आयपीएल जुगार अड्ड्यावर छापा टाकूण प्रतीक रामचंदांनी (२३) रा. सिंदी कॉलनी या मुख्य बुकीस अटक केली. पोलिसांनी १ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हिंगणघाट य ेथील सिंदी कॉलनीतील प्रतीक रामचंदानी राहत्याघरी आय.पी.एल. मधील लाईव्ह क्रिकेट सामन्यांवर सट्याचा घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने छापा कारवाई केली असता तो चेन्नई विरुद्ध दिल्ली संघादरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर मोबाईलवरून जुगार खेळताना मिळून आला.

पोलिसांनी ४ मोबाईल, रोख असा १ लाख ६८ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अटक केली. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा नोंद केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षकसंदीप कापडे यांच्या उपस्थितीत पोलिस अंमलदार रोशन निंबाळकर,विशाल मडावी, सागर भोसले,मिथून जितकार, अरविंद इंगोले, हर्षल सोनटक्के, अभिशेख नाईक, मंगेश आदे, प्रफुल्ल वानखेडे यांनी केली.