केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कडून विभागीय ड्राइविंग सेंटर ईसापूरला सदिच्छा भेट

देवळी/प्रतिनिधी केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी यांनी त्यांच्या संकल्पनेती विभागीय ड्राईविंग ट्रेनिंग सेंटर, ईसापूरला सदिच्छा भेट दिली. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार अशोक उईके, आमदार रामदास आंबटकर, जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, सावंगी मेडिकल कॉलेजचे अभ्युदय मेघे, राजेश बकाने व सौ. कांचन गडकरी, नगराध्यक्ष सौ. शोभा तडस यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. रामदासजी तुम्ही तुमच्या अध्यक्षतेत सर्व प्रशिक्षण केन्द्राला एकत्रीत करा, एक संघटना तयार करा, सर्वांना माझे कडे घेऊन या, तुमचे सर्व विषय मार्गी लावण्याची जबाबदारी मी घेतो असे आश्वासन यावेळी गडकरी साहेंबानी दिले व झालेल्या कामाचे कौतुक केले.

यवतमाळ रस्त्यावरील ईसापूर येथे पाच कोटीच्या खर्चातून विभागीय ड्राईविंग ट्रेनिंग सेंटरची उभारणी करण्यात आली. यात जड व लहान वाहनांच्या चालकांना ट्रेनिंग दिले जाणार असून सुसज्ज्ा व्यवस्था करण्यात आली आहे. देश स्तरांवर उभारण्यात आलेल्या काही ट्रेनिंग पैकी ईसापूर येथील ट्रेनिंग सेंटरचा समावेश असल्याने पाहणीचा कार्यक्रम ठरविण्यात आला. यावेळी नामदार गडकरी यांनी गाडीत बसून सेंटर परिसराचा फेरफटका मारला तसेच कामाबाबत समाधान व्यक्त केले. रामदासजी तुम्ही तुमच्या अध्यक्षतेत सर्व प्रशिक्षण केन्द्राला एकत्रीत करा, एक संघटना तयार करा, सर्वांना माझे कडे घेऊन या, तुमचे सर्व विषय मार्गी लावण्याची जबाबदारी मी घेतो असे आश्वासन यावेळी गडकरी साहेंबानी दिले व झालेल्या कामाचे कौतुक केले.

यावेळी वर्धा लोकसभा क्षेत्रातील महामार्ग संदर्भात चर्चा करण्यात आली व वर्धा लोकसभा क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्ग विभाग, नागपूर मार्फत वर्धा जिल्ह्यातील एकूण १० विविध विकास कामे व राष्ट्रीय महामार्ग विभाग, अमरावती मार्फत मोर्शी व धामणगांव विधानसभा क्षेत्रातील एकूण ११ विकास कामे २०२३-२४ च्या वार्षिक योजनेत प्रस्तावित करण्यात आलेली आहे, या सर्व कामांना स्विकृती प्रदाण करण्याबाबत केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी यांना खासदार रामदास तडस यांनी विनंती केली. यावर कार्यवाही करण्याचे उपस्थित अधिका-यांना आदेशीत केले. कार्यक्रमात खासदार तडस यांनी नामदार गडकरी तसेच उपस्थित पाहुण्यांचे शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन स्वागत केले.

कार्यक्रमाला तहसीलदार यादव, माधव कोटस्थाने, किशोर दिघे, डॉ आशीष परबत, प्रणव जोशी, नरेंद्र मदनकर, राहुल चोपडा, नंदू वैद्य, कल्पना ढोक, विद्या भुजाडे, सारिका लाकडे, सुनीता ताडाम, सुनीता बकाने, शुभांगी कुर्जेकर, मिलिंद ठाकरे, मारोती मरघाडे, दशरथ भुजाडे, रवी कारोटकर, उमेश कामडी, गजानन हिवरकर, सौरभ कडू, अंकित टेकाडे तसेच कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.