ज्येष्ठ समीक्षक डॉ. किशोर सानप यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्राची हानी

वर्धा/प्रतिनिधी विदर्भातील ज्येष्ठ समीक्षक, संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. किशोर सानप यांच्या निधनाने एक साहित्याची आधुनिक मांडणी करणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपल्यातून हरवले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. साहित्य आणि समाज यांचा संबंध मांडताना त्यांनी आधुनिक आणि प्रगतीशील विचारांची पेरणी केली. त्यांच्या लेखनातून तटस्थ, पारदर्शक, निर्भयवृत्ती सातत्याने दिसून येते.

डॉ. सानप यांनी विपुल लेखन तर केलेच, शिवाय विदर्भ साहित्य संघ तसेच विविध साहित्य संस्थांशी त्यांचा अतिशय जवळचा संबंध होता. वर्धा ही त्यांची कर्मभूमी होती. त्यांच्या निधनामुळे साहित्य व शिक्षणाच्या क्षेत्रातील ज्येष्ठ समीक्षक आणि विचारवंताला आपण मुकलो आहोत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.