दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, सावंगी निमल हाऊसला आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानांकन

वर्धा/प्रतिनिधी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ संचालित दत्ता मेघे कॉलेज ऑफ फार्मसी, सावंगी येथील निमल हाऊसला मानकीकरण प्रणालीअंतर्गत आंतरराष्ट्रीय मानक संघटनेद्वारे प्रीक्लिनिकल रिसर्च सुविधेसाठी आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. आयएसओ मानांकनासाठी आंतरराष्ट्रीय मानक संघटनेद्वारे अपेक्षित व आवश्यक असलेल्या विविध निकषांची पूर्तता करीत औषधीनिर्माणशास्त्र शाखेने सादर केलेल्या प्रस्तावानुसार हे मानांकन देण्यात आले आहे.                                                    आंतरराष्ट्रीय मानक संघटनेचे मुख्य लेखापरीक्षक मनीष वाथ यांनी सदर आयएसओ मानांकन प्रमाणपत्र कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे यांना सुपूर्द केले. प्रमाणपत्र हस्तांतरण प्रसंगी प्रकुलगुरू डॉ. गौरव मिश्रा, प्रशासकीय महासंचालक डॉ. राजीव बोरले, मुख्य समन्वयक डॉ. एस. एस. पटेल, कुलसचिव डॉ. श्वेता काळे पिसूळकर, प्राचार्य डॉ. अनिल पेठे, प्रा. डॉ. दीपक खोब्रागडे, निमल हाऊसचे प्रभारी डॉ. विजय लांबोळे यांची उपस्थिती होती.

आयएसओ मानांकनामुळे पदव्युत्तर अभ्यासासाठी तसेच डॉक्टरेट करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा या अभिमत विद्यापीठाकडे वाढेल, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. वाघमारे यांनी व्यक्त केली. यावेळी डॉ. लांबोळे यांच्यासह निमल हाऊसमध्ये कार्यरत असलेले गौरव मुडे, प्रणाली शास्त्रकार, कुमार पोपटकर, सचिन सातपुडके यांना गौरविण्यात आले.