पाच दिवसांत देवळीत लाखो लिटर पाणी रस्त्यावर

देवळी/प्रतिनिधी शहराला पाणीपुरवठा करणार्या मुख्यजलवाहिनीला तडा बसून जलवाहिनीफुटल्यामुळे मागील ५ दिवसांपासून स्टेट बँकपरिसरात हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे. संबंधित अधिकार्यांनी अद्यापही दुरुस्तीसाठी काहीच उपाययोजना न केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. देवळी शहराला अंदोरी येथील वर्धा नदीवरूनपाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी टाकलेल्यामोठ्या जलवाहिनीला तडा जाऊ नये म्हणून अनेक ठिकाणी एअर व्हॉल्व बसवण्यात आलेआहे. जलवाहिनी फुटून पाणी वाया जात असल्यामुळे एअर व्हॉल्वच्या उपयोगिता आणि गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.

आधीच शहरात दोन तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असून नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तर दुसरीकडेसंबंधित अधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळे हजारो लिटर हजारो लिटर पाणी विनाकारण वाया जात आहे. शहरातील ठाकरे चौक, केदार ले-आऊट, चिंतामणी कॉलनी,बकाने ले-आऊट या परिसरातील नागरिक पाण्याच्या टंचाईमुळे भयंकर त्रस्त आहेत. फुटलेल्या जलवाहिनीमुळे शहरात सध्या दूषित पाण्याचा पुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून जलवाहिनीची त्वरित दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. देवळीला होणार्या पाणी पुरवठ्याची योजना वर्धा येथील मजीप्राच्या कार्यालयातून मागील ११ वर्षापासून मनमानी पद्धतीने संचालित केल्या जात आहे.

नागरिकांना पाणी पुरवठ्यासंदर्भात काही तक्रार असल्यास ते नगर पालिका कार्यालयात जातात. तिथे त्यांना मजीप्रा कडे बोट दाखवल्या जाते. मजीप्राचे देवळीत कार्यालयच नसल्यामुळे त्रस्त तक्रारकर्ता विनापाण्याने दिवस काढण्यात समाधान मानतो. शहराची पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेऊन यथाशीघ्र ती देवळी नगर पालिकेला हस्तांतरित करावी अशी देवळीकर नागरिकांची मागणी आहे.