चालत्या कारने घेतला पेट

गिरड/प्रतिनिधी नागपूर-हैदराबाद महामार्गावर हैदराबादकडून नागपूरकडे जाणार्या चालत्या कारने आजदा शिवारात अचानक पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिस तेथे पोहोचल्याने त्यांनी तातडीने वाहन चालकाला बाहेर काढून कारमधील रोख आणि सोन्याचे दागिने वाचविण्यात यश मिळविले. यावेळी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीन ुसार एम.एच.३१ इ.यू. ३३९५ क्रमांकाची कार पेटल्याचे निदर्शनास आले. सर्व पोलिस कर्मचान्यांनी तातडीने धाव घेत कार चालकासह कारमधील साहित्य बाहेर काढले.

कारचालक जगदीश खुशाल वानखेडे (७६) रा. रामदासपेठ नागपूर हे एकटेच हैदराबाद येथून आपल्या घरी जात असताना ही घटना घडली. या कारमधील एका सुटकेसमध्ये तीन लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने होते. पोलिसांनी लागलीच अग्निशमन दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळविले. यामध्ये कार जळून राख झाली असून कारचा सांगाडा बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. जाम महामार्ग पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप थाटे, सहायक उपनिरीक्षक गजानन राऊत, सुनील श्रीनाथ, अशोक भोगे, प्रदीप डोंगरे व दीपक जाधव हे महामार्ग क्रमांक ४४ वर सोनेगाव येथे ट्रेलरचा अपघात झाल्याने घटनास्थळी गेले होते. अपघातग्रस्त ट्रेलर बाजूला करून परत येत असताना त्यांना घटनेची माहिती मिळताच सर्वांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती हाताळली तर समुद्रपूरचे पोलिस कर्मचारी चकोले व जगणे यांनी सहकार्य केले.