हिंडेनबर्ग प्रकरणी अदानी समुहाला “क्लिन चिट”

नवी दिल्ली/प्रतिनिधी हिंडेनबर्ग प्रकरणात अदानी समुहावर झालेल्या आरोपांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने अदानी समूहाला याबाबत “क्लिन चिट’ दिली आहे. या समितीला प्रथमदर्शनी अदानी समूहाच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडले नाहीत. विशेष म्हणजे सेबीला अदानी समूहाच्या शेअर्सच्या किमतीतील बदलाची पूर्ण माहिती असल्याचंही अहवालातून समोर आलं आहे. त्यामुळे अदानींवर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधणाऱ्या विरोधकांचे तोंड पुरते बंद झाल्याची चर्चा आहे.

हिंडेनबर्ग प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल समोर आला असून,त्यात अदानी समूहाने शेअरच्या किमतींमध्ये कोणत्याही प्रकारेफेरफार केला नसल्याचे म्हटलेआले आहे. तसेच अदानीसमूहाच्या कंपन्यांमध्ये बेकायदेशीर गुंतवणुकीचे पुरावे मिळालेले नसून त्यांच्याकडून गुंतवणुकीतका ेणत्याही नियमा ंच े उल्ल ंघन झालेले नसल्याचेही नमुद करण्यातआले आहे.