“एक रंग एक गणवेश’ बाबतचा निर्णय अजूनही प्रतिक्षेत

मुंबई/प्रतिनिधी यंदा शासनाकडून राज्यातील सर्व सरकारी व अनुदानित शाळांसाठी “एकरंग एक गणवेश’ धोरण आखण्याचा विचार सुरू आहे. १५ जून रोजीशाळा सुरु होतील. मात्र शाळा सुरू होण्यास एक महिना शिल्लक असताना शासनाकडून गणवेशाच्या रंगाबद्दलनिर्णय झालेला नाही. कोणत्या रंगाच्यागणवेशाची ऑर्डर द्यायची असा प्रश्न शाळांना पडला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपककेसरकर यांनी शाळा व्यवस्थापन आणिअधिकाऱ्यांसोबत ११ मे रोजी घेतलेल्याबैठकीत गणवेशाबाबतचा निर्णय पुढीलएक ते दोन दिवसांत घेतला जाईल, असे माध्यमांशी बोलताना म्हटलेहोते.

मात्र आठवडाभरानंतरही हानिर्णय न आल्याने कोणत्या गणवेशाचीऑर्डर द्यायची, याबाबत शाळा संभ्रमातआहेत. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मे महिन्यात जिल्हास्तरावर गणवेशासाठी निधी मिळतो आणि विद्यार्थी संख्येनुसारतो शाळांना दिला जातो. त्यानंतरशाळा व्यवस्थापन कापड खरेदी करून विद्यार्थ्यांच्या कपड्यांचे माप घेऊन गणवेश शिवून घेण्याची ऑर्डर देते. परंतु निर्णयाच्या स्थगितीमुळे यासंदर्भात शिक्षण विभागाने स्पष्टता आणावी अशी मागणी शाळा व्यवस्थापनाने केली आहे.