ना. डॉ. कराड यांच्या हस्ते रुग्णसुविधेचे लोकार्पण; सावंगी मेघे रुग्णालयाला दिली भेट

वर्धा/प्रतिनिधी सावंगी येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठातील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या पुनर्निर्मित प्रशासकीय भवनाचे तसेच आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोग, प्रसूती व शस्त्रक्रिया बाह्यरुग्ण विभागाचे उद्घाटन भारत सरकारचे वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, खासदार रामदास तडस, विद्यापीठाचे प्रधान सल्लागार व माजी आमदार सागर मेघे, अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय गायधने, रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, संशोधन व विकास विभागाचे संचालक डॉ. जहीरुद्दीन काझी, सहकुलसचिव डॉ. सुधाकर शिंदे, डॉ. मनीष देशमुख, स्त्रीरोग व प्रसूती विभाग प्रमुख डॉ. निमा आचार्य, टेस्ट ट्युब बेबी सेंटरच्या संचालक डॉ. दीप्ती श्रीवास्तव, डॉ. प्रतापसिंह परिहार, प्रशासकीय अधिकारी राजेश सव्वालाखे, डॉ. रुपाली नाईक यांची उपस्थिती होती.