विना परवानगी मानसोपचार दवाखान्यावर छापा

हिंगणघाट/प्रतिनिधी विना परवानगी सुरू असलेल्यामानसोपचार रुग्णालयावर एफडीएने छापा टाकला. या रुग्णालयातून विविध प्रकारची ६८ हजार ४७६ रुपयांची औषधी जप्त करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. सोनल आडलकर (गोयंका) मानसोपचार रुग्णालय चालवित असल्याचे पुढे आले आहे. रुग्णालय विना परवानगी सुरू असल्याचे कळताच तपासणी सुरू होती. परवानगी नसताना बिलावर औषधींची विक्री सुरू होती. अन्न व औषध प्रशासनाचे सतीश चव्हाण यांना रुग्ण म्हणून औषधींची विक्री केली. तपासणीदरम्यान बुधवारी छापा टाकूण कारवाई केली.

यावेळी औषधींचे दोन नमुने, अल्प्राझोलम, क्लोनाझेपाम तथा मानसोपचार औषधीचा विना परमीटचा संच आढळला. यावेळी ६८ हजार ४७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.