भारतीय खाद्य निगम व्दारा शेतकऱ्याकडून धान्य खरेदी करण्याकरिता सुलभता आणावी- खासदार रामदासजी तडस यांची सूचना

मुंबई-वर्धा/प्रतिनिधी शेतकर-यांकडून अन्नधान्याची खरेदी आणि वितरण, अन्नधान्याची गुणवत्ता, अन्नधान्याचा साठा, पारगमन आणि साठवणूक हानी, अंत्योदय दारिर्द्यरेषेखालील आणि दारिर्द्यरेषेवरील कुटुंबे, आणि केंद्रामार्फत चालवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांसाठी अन्नधान्याचे वाटप, उचल आणि प्रत्यक्ष वितरण किंवा राज्य सरकार. लक्ष्यित सार्वजनिक वितरण प्रणाली तपशीलांसह सुधार आवश्यक आहे, यासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी नविन गोदामाची निर्मीती करणे, गोडाऊन नियमीत तपासनी करणे, शेतक-याकडून धान्य खर ेदी करण्याकरिता स ुलभता आणने, तसेच विविध योजनेच्या लाभार्थ्यांना वेळेत धान्य पुरवठा करण्यासाठी नियोजन करण्याकरिता योग्य उपायोजना करावे असे स्पष्ट निर्देश खासदार रामदास तडस यांनी यावेळी भारतीय खाद्य निगम महाराष्ट्र राज्य सल्लागार समितीच्या बैठकीत दिले.

भारतीय खाद्य निगम महाराष्ट्र राज्य सल्लागार समितीच्या बैठक दिनांक १६ मे २०२३ रोजी भारतीय खाद्य निगमचे अतिथीगृह मुंबई येथे खासदार तथा भारतीय खाद्य निगम महाराष्ट्र राज्य सल्लागार समितीचे अध्यक्ष रामदास तडस यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न झाली, या बैठकीला भारतीय निगम महाराष्ट्र चे महाप्रबंधक श्री. मनमोहन सिंग सारंग, महाराष्ट्र राज्याचे अशासकीय सदस्य श्री. अनिल संचेती, सहा. महाप्रबधंक श्री के.सत्य कुमार, सहा. महाप्रबधंक श्री. अर्शदीप रॉय, सहा. महाप्रबधंक श्री राजेश वर्मा, उपस्थित होते.बैठकीमध्ये विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेचअशासकीय सदस्यांच्या माध्यमातूनउपस्थित करण्यात आलेल्या विविधमुद्दयावर बैठकीमध्ये सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी भारतीय खाद्य निगम व्दारा महाराष्ट्रातील गोदाऊन तसेच साठवण क्षमता, गोडाऊन नियमीत तपासनी करणे, प्रत्येक जिल्हयात नविन गोदाऊन चीनिर्मीती, राज्यातील एक देश एक रेशन कार्ड, महाराष्ट्रातील विविध विषयासंबधीत अधिका-यांनीमाहिती दिली.                                           श्री अनंत पांडुरंग बनसोडे,श्री संदिप सदाशिव सावळे, श्री पवन विठ्ठलराव थोटे, श्री सचिन रामभाऊ जायभाये, श्री गजेंद्र ज्ञानेश्वरकापडे, श्री रामेश्वर पाटील, श्रीसिद्धेश्वर मुरलीधर, श्री माणिकराव पुंडलिकराव लोहगावेश्री कपिलरावणराव दहेकर, श्री शिवाजीराव परबतराव ढमाले, श्री पृथ्वीराजदेवराम गाधारी, श्री पंढरीनाथ(पंडित अण्णा) मदने, श्री मेघश्यामए. करडे, श्री विकास (बाबुलाल) बबनराव ढोरमारे, श्री किशन माधव धुळशेट्टे, श्री गणेश तुकारामवलकुंडे, श्री राहुल महेंद्र अग्रवाल,श्री संतोष शांताराम गांगण, श्री दिपक रामकिसन तांबे, श्री गणेश सुखदेव काटकर, श्री तुळशीराम (तुषार) मार्लवार, श्री नंदकिशोर गोपीचंद दंडारे, श्री लालबाबूअंबिकलाल गुप्ता, ॲड. श्वेता मिश्रा,श्री अभिषेक मिश्रा, श्री. विजय मोरे(डेस्क ऑफिसर) नागरी पुरवठा. भारतीय खाद्य निगम चे अधिकारीश्री आशुतोष आर्य, श्री अजयचौधरी, श्री एस.टी. माने एजीएम (ए/सी),श्री स्वाती हिरे श्री बिना एक्का, श्री जितेंद्र ठाकूर एजीएम, श्री नवीन कुमार, श्री सुकांता कुमारजेना, अनिल कदम व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.