दत्ता मेघे कॉलेज ऑफ फार्मसी, सावंगी येथे विद्यार्थ्यांसाठी रसायनशास्त्रावर तीन दिवसीय कार्यशाळा

वर्धा/प्रतिनिधी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ संचालित दत्ता मेघे कॉलेज ऑफ फार्मसी, सावंगी येथे ‘अनफोल्ड द मिस्त्री ऑफ केमिस्ट्री ‘ या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे मुख्य समन्वयक डॉ. एस. एस. पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पेठे, शासकीय औषधी निर्माणशास्त्र महाविद्यालय, अमरावती येथील प्रा. डॉ. नंदकिशोर कोटगले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील डॉ. निशिकांत राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात डॉ. कोटगले यांनी रसायनशास्त्राचा अभ्यास कसा करायचा, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

तर दुसऱ्या सत्रात डॉ. राऊत यांनी औषधी संशोधनामध्ये रासायनिक पृथ्थकरणाचे महत्त्व विशद केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी शिरपूर येथील आर. सी. पटेल औषधी निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे डॉ. सौरव खडसे यांनी रासायनिक अभिक्रिया व औषधी गुणवत्ता याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. तर चांदवड येथील डॉ. विवेकानंद चटपल्लीवार यांनी त्रिमितीय रसायनशास्त्र व त्याचे औषधी प्रक्रियेतील महत्त्व हा विषय सोदाहरण समजावून सांगितला. तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनाप्रयोगशाळेत विविध प्रयोग वप्रात्यक्षिके सादर करण्याची संधी देण्यात आली.

या कार्यशाळेतदोनशेहून अधिक विद्यार्थी व सुमारे२५ शिक्षक सहभागी झाले होते. या कार्यशाळेकरिता अभिमत विद्यापीठाचे प्रकुलपती डॉ.वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरू डॉ.ललित वाघमारे, प्रकुलगुरूडॉ. गौरव मिश्रा, कुलसचिवडॉ. श्वेता काळे पिसूळकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेच्या आयोजनात प्राचार्य डॉ. अनिल पेठे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. दीपकखोब्रागडे, डॉ. सुरेंद्र अग्रवाल,डॉ. अवधूत पिंपळे, डॉ. पंकज डांगरे, प्रा. सुकेशिनी लोटे, प्रा. प्रणिता जिरवणकर, प्रा. निकिता चांभारे, डॉ. दर्शन तेलंगे यांच्यासहशिक्षक, प्रशासकीय अधिकारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.