माणसांना जोडण्याचे काम गज़ल करते- संजय इंगळे तिगावकर

वर्धा/प्रतिनिधी अरबी फारसीतून आलेली गज़ल उदर्ूचे बोट धरून मराठी साहित्यात दाखल झाली आणि मराठीसह विविध भारतीय भाषांमध्ये रुजली. मानवी मनातील द्वेष दूर सारूनमाणसांना जोडण्याचे काम गज़लेने केलेआहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गझलकार संजयइंगळे तिगावकर यांनी सृजन साहित्य संघाद्वारेआयोजित गज़ल लेखन कार्यशाळेत केले. स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिकजिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित याकार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सृजनसाहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष तथाललित लेखक रवींद्र जवादे, मूर्तिजापूरलाभले होते. यावेळी, जिल्हा ग्रंथालयाचे गौरीशंकर टिबडेवाल, गज़लकार विद्यानंद हाडके, बालसाहित्यिक प्रमोद पंत, प्राचार्य जयश्री कोटगीरवार, सृजन साहित्य संघाच्याशाखाध्यक्ष प्रीती तडस वाडीभस्मे यांचीप्रमुख उपस्थिती होती.

या कार्यशाळेत प्रारंभी संजय इंगळेतिगावकर यांनी मराठी गज़लेचा इतिहास, वर्तमान आणि वाटचाल या विषयाची मांडणी केली. मराठी गज़ल ही केवळ रिवायती म्हणजे परंपरावादी न राहता तरक्कीपसंद म्हणजेच सुधारणावादी झाली असून वर्तमान राजकीय, सामाजिक परिस्थितीवर ती भाष्य करते, असे उद्गार त्यांनी काढले. गज़लेचा बहर सांभाळला की गज़ल बहरत जाते आणि साहित्यात बहार आणते, असेही ते म्हणाले.

गज़लेचा कारवा नवोदितांनी पुढे न्यावा-

विद्यानंद हाडके या कार्यशाळेत सुप्रसिद्ध गज़लकार विद्यानंद हाडके यांनी गज़ल लेखनाचे तंत्र आणि मंत्र या विषयाची मांडणी केली. या सत्रात त्यांनी गज़लेचा आकृतीबंध, मतला, मक्ता, शेर, मिसरा, रदीफ, काि़फया, वृत्त, मात्रा, अलामत, यतिभंग या गज़ल लेखनाबाबत आवश्यक असलेल्या बाबींची उदाहरणासह मांडणी केली. नव्याने गज़ल लिहिताना केवळ तंत्राचाच विचार न करता गज़लियतही जिवंत ठेवली पाहिजे.

मराठी गज़लेचा कारवा पुढे नेण्याची जबाबदारी आता नवोदितांवर आहे, असे मत विद्यानंद हाडके यांनी मांडले. कार्यशाळेच्या अंतिम सत्रात गज़लेबाबतचे संभ्रम आणि शंकांबाबत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून निरसन करण्यात आले. या सत्रात संजय इंगळे तिगावकर, विद्यानंद हाडके, किरणकुमार मडावी, महेन महाजन यांनी मार्गदर्शन केले. या एकदिवसीय कार्यशाळेच्या आयोजनाची भूमिका प्रीती तडस वाडीभस्मे यांनी मांडली. संपूर्ण कार्यशाळेचे सूत्रसंचालन ज्योती भगत यांनी केले. कविता बेदरकर यांनी आभार मानले. कार्यशाळेत सुमारे ५० कवीलेखक सहभागी झाले होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता मीनल गिरडकर, दीपक गुढेकर, प्रा. राकेश वाडीभस्मे, प्रशांत ढोले, तेजस भातकुलकर, सुचिता बुधे, व ेद वाडीभस्मे आणि साहित्य संघ परिवारातील सदस्यांनी सहकार्य केले.