“निधी वळता करा अन्यथा राजीनामा देतो’, भाजपा आमदार दादाराव केचे यांचे पालकमंत्री फडणवीस यांना खरमरीत पत्र

वर्धा/प्रतिनिधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव सुमित वानखेडेयांनी आर्वी मतदारसंघात विकास कामांसाठी लक्षणीय निधी आणला.त्यावर तीव्र आक्षेप घेत भाजपा आमदार केचे यांनी फडणवीसयांना पत्र लिहून एक प्रकारे जाबचविचारला आहे. या पत्रातून ते म्हणतात,की कारंजासाठी दिलेला निधीआष्टीत व आर्वीत वळता करा. मागणी नसताना हा निधी कसा मंजूर झाला? फडणवीस हेजिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.त्यांच्या निधी मंजूर करण्याच्याअधिकारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत तीन दिवसांत मंजूर केलेला निधी तात्काळ रद्द करावा व तो आर्वीला द्यावा, असा निर्णय न घेतल्यास मला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, असा निर्वाणीचा इशारा गडकरी समर्थक म्हटल्या जाणाऱ्या केचे यांनी दिला आहे.                                         मुंबईतून प्रतिनिधीसोबत बोलताना ते म्हणाले, की आमदार मी असल्याने माझ्या पत्रावर निधी मिळावा. पत्र नसताना निधी कसा? आज मंत्रालयात काम असून उद्या पक्षाची मीटिंग आहे. त्यानंतर बघू, असे म्हणणारे केचे हे आता आरपारची लढाई करण्याच्या भूमिकेत आल्याचे दिसून येते.