५ बाजार समित्यांमध्ये सभापती, उपसभापती विराजमान

वर्धा/प्रतिनिधी जिल्ह्यातील हिंगणघाट, आष्टी,आर्वी, सिंदी (रेल्वे) आणि पुलगाव बाजार समितीच्या सभापती-उपसभातींचीनिवड सोमवार १५ रोजी पार पडली. हिंगणघाट बाजार समितीमध्ये ॲड.सुधीर कोठारी यांची सलग पाचव्यांदा सभापतीपदी तर उपसभापतीपदी हरीश वडतकर यांची निवड झाली. आवकृउबा समितीत सभापती संदीप काळे तरउपसभापतीपदी प्रशांत वानखेडे, पुलगावबाजार समितीत सभापती मनोज वसू आणि उपसभापतीपदी संजय कामनापुरसिंदी बाजार समितीच्या सभापतीपदी केशरीचंद खंगारे, उपसभापतीपदीप्रमोद आदमने तर आष्टी बाजारसमितीत सभापतीपदी राजेंद्र खवशीतर उपसभापतीपदी मनोज घावट यांची निवड झाली.

सभापतीपदी ॲड. कोठारी हिंगणघाट – बाजार समितीच्यामुख्यालयात नवनिर्वाचित संचालकाची बैठक झाली. यावेळी सहायकनिबंधक आर. एन. पोथारे निवडणूक अधिकारी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगीसभापतीपदासाठी ॲड. सुधीर कोठारी व संजय कातरे यांचे अर्ज आले. कातरेयांच्या अर्जावर अनुमोदन व सूचकयांच्या स्वाक्षरी नसल्याने निवडणूकअधिकारी पोथारे यांनी अर्ज फेटाळून लावल्याने ॲड. सुधीर कोठारी यांची अविरोध निवड जाहीर करण्यात आली.उपसभापतीपदासाठी हरीष वडतकरएकमेव अर्ज आल्याने त्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. निवडघोषित होताच ॲड. सुधीर कोठारीयांच्या समर्थकांनी जल्लोष केला. यानंतर विजयी सभापती व उपसभापती यांचा त्कार करण्यात आला. या बाजसमितीवर २००० पासून मी सभापती पदावर आहे. शेतकरी केंद्रबिंदू ठेऊन आम्ही सर्व संचालक शेतकरी हिताचे कार्य करीत असल्याने या निवडणुकीत विरोधी गटाच्या नेत्यांनी अपप्रचार करूनद्धा आमच्या गटाला ग्रामीण मतदारप्रचंड मतांनी विजयी केले, असे ॲड. सुधीर कोठारी यांनी सांगितले.

आर्वीत सभापतीपदी संदीप काळे आर्वी – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीपदाची निवड निवडणूक निर्णय अधिकारी जयंत तलमले यांच्या अधक्षतेखाली पार पाडली. सभापतीपदी संदीप काळे व उपसभापतीपदी प्रशांत वानखेडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सभापती संदीप काळे आणि उपसभापती प्रशांत वानखेडे यांचे आ. दादाराव केचे यांनी अभिनंदन केले. विद्यमान संचालक गजानन निकम, भीमराव कुर्हाडे, विजय गुल्हाणे, गजानन जवळेकर, प्रज्वल कांडलकर, शिरीष महल्ले, शोभा काळे, गायत्री बोके, मधुकर चौकोणे, मंगेश मानकर, बाळा सोनटक्के आदींचे अभिनंदन केले.

पुलगाव कृउबासच्या सभापतीपदी मनोज वसू पुलगाव – येथील बाजार समितीच्या सभापती-उपसभापतीची निवड निवडणूक निर्णय अधिकारी लता काटोले यांच्या उपस्थितीत पार पडली. सभापतीपदासाठी मनोज वसू व उपसभापतीपदासाठी संजय कामनापुरे यांचे एकमेव अर्ज आल्याने सभापती व उपसभापतींची निवड बिनविरोध झाली. आ. रणजित कांबळे व माजी आ. सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीच्या सर्व जागा जिंकण्यात यश आल्याने आ. कांबळे यांनी स्वतः उपस्थित राहून नवनिर्वाचित सभापती, उपसभापती व संचालकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालक मनोज वसू, प्रमोद वंजारी, रवींद्र चौधरी, मनीष खडसे, संजय गावंडे, अरविंद वानखेडे आदींची उपस्थिती होती.

सिंदी बाजार समितीच्या सभापतीपदी केशरीचंद खंगारे सेलू – सिंदी (रेल्वे) बाजारसमितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे केशरीचंद खंगारे यांची सभापतीपदी तर काँग्रेसचे प्रमोद आदमने यांची उपसभापतीपदीअविरोध निवड करण्यात आली. बाजारसमितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसआणि काँग्रेस आघाडीला १८ पैकी१५ जागेवर आपले उमेदवार निवडून आणण्यात यश आले. तर ३ जागेवर विरोधी गटाचे उमेदवार निवडून आले. सभापती तसेच उपसभापतीपदी कुणाचीवर्णी लागणार याबाबत अनेक तर्कवितर्कलावले जात होते. मात्र, केशरीचंद खंगारयांची वर्णी लागली. तर उपसभापतीपदीकाँग्रेसचे प्रमोद आदमने यांची निवड करण्यात आली.

आष्टीत काँग्रेसचे सभापती, उपसभापतीपदी अविरोध आष्टी – कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेसचे सभापती, उपसभापतीपदी अविरोध निवडून आले. सभापती म्हणून राजेंद्र खवशी तर उपसभापतीपदी मनोज घावट यांची निवड झाली. सभापती, उपसभापतींच्या अविरोध निवडीचे स्वागत करण्यात आले.