पावसाळ्यातील संभाव्य आपत्ती व्यवस्थापनासाठी दक्ष रहा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

वर्धा/प्रतिनिधी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अचानकपण े काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे संबंधित विभागांनी आपले आपत्ती व्यवस्थापन आराखडे तातडीने तयार करुन घ्यावे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी विभागांनी दक्ष राहिले पाहिजे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात श्री.कर्डिले यांनी मान्सुनपूर्व तयारीचा आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उपजिल्हाधिकारी नितीन पाटील, सुप्रिया डांगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर,कार्यकारी अभियंता रवी वऱ्हाडे,उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले,सचिन कुमावत यांच्यासह विभाग प्रमुखअधिकारी उपस्थित होते. हवामान खात्याने यावर्षी जिल्ह्यात९६ टक्के पावासाचा अंदाज वर्तविला आहे. ही चांगली बाब आहे.

काही वेळा अचानक जोरदार पावसासहमुसळधार होण्याची शक्यता असते.त्यामुळे नदीकाठावरील गावांच्या आपत्तीव्यवस्थापनासाठी पुरेशी तयारी आधीचकरुन ठेवावी. प्रत्येक विभागाने दि.२० मे पुर्वी आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करुन सादर करावे व १ जुन पासुननियंत्रण कक्ष सुरु करावे. नियंत्रण कक्षातपुर्णवेळ एक संपर्क अधिकारी नियुक्त करावा, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनीबैठकीत केल्या.आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन कसे करावे. यासाठीसंबंधितांचे प्रशिक्षण, बचाव वशोध साहित्याचा वापर याबाबतसंबंधितांना पुरेशे प्रशिक्षण देण्यात यापुरपरिस्थितीसह अतिवृष्टी झाल्यासआरोग्यविषय प्रश्न देखील उपस्थितहोऊ शकतात. त्यामुळे आरोग्यविभागाने देखील आधीच पुरेशी तयारी ठेवावी, विभागांनी पावसाळ्या दरम्यान तहसिदारांच्या संपर्कात राहावे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनीनदीकाठावरील गावे, पर्जन्यमान,धरणांची स्थिती, पुर संवेदनशिलगावे, शोध व बचाव कार्य, विअटकाव यंत्रणा, नियंत्रण कक्षआदींचा सविस्तर आढावा घेतला.आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांबाबत महसूल, सार्वजनिबांधकाम, आरोग्य, पाटबंधारे, लपाटबंधारे, पोलीस, विज वितरणकंपनी, नगर पालिका, पुरवठा विभाग, शिक्षण विभाग, पशुसंवर्धन विभाग,कृषि, परिवहन आदी विभागांचाहीत्यांनी आढावा घेतला. बैठकीला सर्व तहसिलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारीउपस्थित होते.