कोस्टल हायवेला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव- मुख्यमंत्री

मुंबई/प्रतिनिधी मुंबईतील कोस्टल हायवेचे नामकरण छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी क ेली. गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवानिमित्त मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. या कार्यक्रमाला पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार यामिनी जाधव, राजमाता जिजाऊंचे वंशज विजयराव जाधव आणि समन्वयक उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य व बलिदान नव्या पिढीला मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे. राज्यातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.

छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या वढू बुद्रुक आणि तुळापूर यादोन्ही ठिकाणच्या विकासयोजना राबविण्यात येत आहेत. हा ऐतिहासिक वारसा येणाऱ्यापिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेलमुंबईतील कोस्टल हायवे परिसरातछत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा बसवण्यात येणार आहे.छत्रपती संभाजी महाराज यांचीजयंती मुंबईतील गेट वे ऑफ इंडियायेथे प्रथमच साजरी होत आहे, ही आनंदाची बाब आहे. उत्सवाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती प्रेरणादायीअसून शिवशंभूरायांचे कार्य वयोगदान लक्षात घेणे आनंदाचबाब आहे. देशभरात छत्रपतीसंभाजी महाराज जयंती उत्सवसाजरा होणार आहे.