अजित पवारांचे मोठे विधान…तरी शिंदे सरकार पडणार नाही!

मुंबई/प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे विधान चर्चेचा विषय बनला आहे. अजित पवार म्हणतात की, १६ बंडखोर आमदारांना अपात्र ठरवले तरी शिंदे सरकारला कोणताही धोका नाही. आतात्यांच्या विधानाचा अर्थही काढला जातआहे. कर्नाटकातील भाजपच्या पराभवानंतरसंपूर्ण विरोधक उत्साहित असताना अजित पवारांचे हे वक्तव्य आले आहे. अजितपवारांचा पक्षही निवडणुकीच्या तयारीला लागला आहे.

अजित पवार यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. प्रथम ते त्यांच्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असे सांगण्यात आले त्यानंतर काका शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हाही अजित पवारांची भूमिका इतर नेत्यांपेक्षा वेगळी होती. अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात सर्व काही ठीक नसल्याचं बोलले जात आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अजित पवार महाविकास आघाडी सरकारमध्ये क्वचितच सक्रिय दिसले.