आर्वीत एकाच दिवशी २४ ठिकाणी विकासाची कुदळ

आर्वी/प्रतिनिधी विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविणे, अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, दलितोत्तर सुधार योजनेतुन ४ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भुमिपूजन रविवार १४ रोजी आ. दादाराव केचे यांच्या हस्ते करण्यात आले. एकाच दिवशी २४ ठिकाणी भूमिपूजन करण्याचा पहिलाच अनुभव आर्वीकरांना आला. एलआयसी कॉलनी येथे सुकळकर ते गोंधळी ते बावणे यांचे घरापर्यंत रस्ता, पूजा कॉलनीमध्ये रहाण ते ओपन स्पेसपर्यंत ते इंगळे घरापर्यंत रस्ता. पूजा कॉलनीमध्ये बाबुळकर ते टाके ते कदम ते शळके यांचे घरापर्यंत रस्ता, पूजा कॉलनी येथे कोल्हे ते मेश्राम यांच्या घरापर्यंत सिम ेंट रस्ता बालाजीनगर गुल्हाने ते अजमिरे ते वरडे ते अजमिरे यांचे घरापर्यंत रस्ता. तळेगाव रोड पासुन चोरडीया ऑईल मिल ते हनुमान मंदिरपर्यंत रस्ता, आसोलेनगर येथीलजाऊरकर ते मिसाळ यांचे घरापर्यंत रस्ता, प्रभाग ३ मध्ये खुली जागा पोलिस कॉलनी जवळील जागेमध्ये वाचनालयाचे बांधकाम आदी कामांचे भुमिपूजन आ. दादाराव केचे यांच्या हस्ते करण्यात आले.

शहराच्या विकासाकारिता व नागरिकांना मुलभुत सुविधा देण्याकारिता निधी उपलब्ध करण्यात येईल व शहराच्या विकासाकारिता प्रयन्त करीत राहील असे आ. केचे म्हणाले. याप्रसंगी प्रशांत सव्वालाखे, सुनील बाजपेयी, अजय कटकमवार, प्रकाश गुल्हाने, जगन गाठे, संजय थोरात, पल्लवी काळे, उषा सोनटक्के, सारिका लोखंडे, नंदू वैद्य, डॉ. श्याम भूतडा, आदींची उपस्थिती होती.