जिप, पं.स संघटनेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षपदी सरिता गाखरे

वर्धा/प्रतिनिधी राष्ट्रीय जिल्हा परिषद व पंचायत समिती संघटनेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षपदी वर्धा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सरिता गाखरे यांची नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिल्ली येथे त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सरीता गाखरे यांचा कार्यकाळ जिपत विकासासाठी चांगला राहिल्याने त्यांना भारतीय जनता पार्टीत वेगवेगळी संधी मिळते आहे.

त्यांची नुकतीच भापजाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झालीअसताना त्यांची राष्ट्रीय अध्यक्षम्हणून जबाबदारी देण्यात आली. नियुक्तीच्या वेळी २१ राज्यातील ४८ जिल्हा परिषद अध्यक्ष उपस्थितहा ेत े. आतापयर् ंत ही स ंघटना राज्यापर्यंत मर्यादित होती. आता ही राष्ट्रीय पातळीवर काम करीत आहे.

या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. कैलास गोरे पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस बिरी शांती (हिमाचलप्रदेश), राष्ट्रीय कार्याध्यक्ष शिवप्रतापरघुवंशी (मध्य प्रदेश) व राष्ट्रीय कार्यकारिणीत सर्व सदस्यांच्याउपस्थितीत असोसिएशनच्या राष्ट्रीयमहिला अध्यक्षपदाचा पदभार सरितागाखरे यांना देण्यात आला.