पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटेचा हवामान खात्याचा अंदाज; नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

वर्धा/प्रतिनिधी जिल्ह्यात पुढील काही दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. उष्णतेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. तहाण लागलेली नसली तर सुध्दा जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत. बाहेर जांना गॉगल्स छत्री, टोपी, बुट व चप्पलचा वापर करावा. प्रवास करतांना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींर्नी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस घरी बणवण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबुपाणी, ताक इत्यादीचा वापर करावा.

अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ईत्यादी उन्हाचा झटकबसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. कामाच्या पाणी द्यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर ठिकाणी जवळच पिण्याच्या पाण्याची व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री व्यवस्था करण्यात यावी. सुर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचितकरावे. पहाटेच्या वेळी जास्तीत जाकामाचा निपटारा करावा. बाहेर कामकाज करित असतांना मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा. गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी.रस्त्याच्या कडेला उन्हापासुन संरक्षणाकरीताशेड उभारावे. जागोजागी पानपोईची सुविधाकरण्यात यावी.

काय करु नये : लहान मुले व पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या पार्क केलेल्यावाहनात ठेऊ नये. दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत उनहात बाहेर जाणे टाळावे. गडद व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेरील तापमान अधिक असल्यासशारीरीक श्रमाची कामे टाळावीत. उन्हाच्याकालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी,असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्याआले आहे.