“शासन आपल्या दारी’ च्या माध्यमातुन नागरिकांना सर्व सेवा व योजनेचा लाभ एकाच छताखाली- खा. रामदास तडस

पुलगांव/प्रतिनिधी नागरिकांना अनेक योजनांची माहिती नसल्यामुळे संभ्रन निर्माण होतो, नागरिकांना माहितीच्या अभावी वारंवार विविध कार्यालयांना येजा करावी लागते. बऱ्याचदा आवश्यक कागदपत्र त्यांच्याकडे नसतात, त्यामुळे त्यांची कामे वेळेत होत नाही, महाराष्ट्र सरकारने सामान्य नागरिकांचा हित लक्षात घेऊन त्यांना सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी “शासन आपल्या दारी’ अभियान सुरु केले आहे, अभियानांतर्गत नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ आणि विविध महत्वाची कागदपत्रे एकाच छताखाली “शासन आपल्या दारी’ शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्यामुळे या फायदा नागरिकांनी घ्यावा असे प्रतिपादन खासदाररामदास तडस यांनी केले.

नगर परिषद पुलगांव व्दारामहाराष्ट्र शासन महाराजस्वअभियांनांतर्गत “शासन आपल्या दारी’ शिबिर कार्यक्रम खासदाररामदास तडस यांच्या उपस्थितीत संपन्न झाले, यावेळी मुख्याधिकाविजयकुमार आश्रमा, नितीन बडगेव नगर परिषद पुलगांव अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नगर परिषद पुलगांव अंदाज पत्रकाच्या ५ टक्के निधी रु. ६.०० लक्ष रुपये नगर परिषद क्षेत्रातील दिव्यांगाना चेकचे वाटप करण्यात आले, पंतप्रधान स्वनिधीयोजने अंतर्गत पथविक्रेत्यांनाप्रमाणपत्र व प्रधानमंत्री आवासयोजना (शहरी) पुर्ण झालेल्याघरकुल लाभार्थ्याना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचालाभ तळागाळातील जनतेलादेण्यासाठी शासन कटिबद्ध असून आज आयोजित केलेला महाराष्ट्र सरकारने “शासन आपल्या दारी’ हे शिबिर संपुर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी सुरु केलेले आहे. याशिबीराच्या माध्यमातुन सर्वसामान्यजनतेला सर्व सेवा एकाच ठिकाणीमिळणार आहे.