पत्रकारांच्या मागण्या संसदेत मांडणार- खा. तडस

वर्धा/प्रतिनिधी पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी वर्धेत महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेच्या वतीने ११ रोजी धरणे आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलन स्थळाला खा. रामदास तडस यांनी भेट देत पत्रकरांच्या मागण्या संसदेत मांडणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा चर्चा करून मागण्या मान्य करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल चालणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ, पत्रकारितेत पाच वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती, जाहिरातीवरील जीएसटी रद्द करण्यात यावे, पत्रकारांना हक्काचे घरासाठी भूखंड, कोरोनात जीव गमावलेल्या पत्रकाराना फ्रंट लाईन वर्कर्सचा दर्जा देऊन पत्रकारांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे, वर्धा शहरात पत्रकार भवनाची निर्मिती करावी आदी विविध मागण्याकरिता आंदोलन करण्यात आले.या धरणे आंदोलनाला खा. रामदास तडस या ंच्यासह आ. प ंकज भा ेयर, ज्येष्ठ पत्रकार हरिभाऊ वझुरकर तसेच विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्यांनी भेट दिली.

त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना मागण्यांचे निवेदन देऊन मागण्या रेटून धरण्यात आल्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कथले, नरेंद्र देशमुख, व्हाईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष प्रमोद पाणबुडे, साप्ताहिक विंगचे अध्यक्ष वरून पांडे, एकनाथ चौधरी, किशोर कारंजेकर, निलेश पिजरकर, अनिल गावंडे, मनिष शर्मा, चेतन व्यास, उमेश ताकसांडे, रमेश निमजे, प्रदीप जैन, महेश मुजेवार, वृणाल ढोक यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.